pankaja munde sakal
मराठवाडा

Pankaja Munde : 'सनसनीखेज' बातम्यातून जमले तर...; पंकजा मुंडेंचं ट्वीट चर्चेत

जनमानसात माझी प्रतिमा चांगली असेल तर मोदीही माझं राजकारण संपवू शकणार नाहीत, असे विधान पंकजा मुंडेंनी केले होते.

सकाळ डिजिटल टीम

Pankaja Munde News : जनमानसात माझी प्रतिमा चांगली असेल तर मोदीही माझं राजकारण संपवू शकणार नाहीत, असे विधान पंकजा मुंडेंनी केले होते. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांमध्ये आता स्वतः पंकजा मुंडेंनी ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी टीका करण्याचे कान टोचत एक सल्ला दिला आहे.

मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17sep पासून विविध कार्यक्रम केले, त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाच्या highlightsआपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे, "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर, हेही पहा. मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच. धन्यवाद. असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

मुनगंटीवारांकडून मात्र पाठराखण

अनेकदा असे होते की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव पंकजा मुंडेंचा असावा असे मला वाटते. मात्र, यासंबंधीचे अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतले पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले.

मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच असेदेखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही अशी प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

SCROLL FOR NEXT