pooja pooja
मराठवाडा

पुजाचे न्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अधुरेच...

न्यायाधीशांची परिक्षा पास होऊनही कोरोनाकाळ असल्याने शासनाकडून रुजू होण्यासाठी ऑर्डर आलेली नव्हती

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (बीड): शहरातील मोंढा भागात राहणाऱ्या ॲड. पुजा वसंत मुंडे (वय २५) यांचा विजेचा शॉक लागून गुरुवारी (ता.१०) दुर्देवी मृत्यू झाला. परिक्षा पास होऊनही कोरोनामुळे न्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे. येथील मुख्य बाजारपेठेत वास्तव्यास असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांची मुलगी. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच सुमारास शहरात जोरदार पाऊस पडत होता. यावेळी घरातील वरच्या मजल्यावरील रुमचे दरवाजे उघडे असल्यामुळे रुममध्ये पावसाचे पाणी साचलेले होते, पुजा हा दरवाजा बंद करण्यासाठी रुममध्ये जाताच विजेच्या बोर्डातून रुममध्ये करंट उतरलेला असल्याने शॉकचा धक्का बसून पुजाचे निधन झाले.

ॲड .पुजा मुंडे हीचे एल एल बी. एल. एल. एम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. एल.एल. एम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. यामध्ये विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच २०२० मध्ये न्यायाधीशची परीक्षाही पास झाली. या निकालात मुलींमधून राज्यात दुसरी, तर सर्वसाधारण मध्ये राज्यात १० वा क्रमांक पटकावला होता. एल.एल.बी मध्ये ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून दुसरा क्रमांक पटकावला होता.

न्यायाधीशांची परिक्षा पास होऊनही कोरोनाकाळ असल्याने शासनाकडून रुजू होण्यासाठी ऑर्डर आलेली नव्हती. म्हणून पुजा वर्षे भरापासून घरीच होती. न्यायाधीश म्हणून काम करण्याचे पुजाचे स्वप्न या अपघाती निधनामुळे अपुरे राहिले. पुजावर शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ वाजता येथील सार्वजनिक समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात वडील, आई, एक भाऊ असा परिवार आहे. काँग्रेसचे जेष्ट नेते वसंत मुंडे यांची ती मुलगी होत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT