परभणी ः कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार परभणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरात तर संसर्गाचा आलेख वाढेलेलाच असला तरी तालुक्यातील ग्रामीण भागातही बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखळ होत असल्याने कोरोना विषाणुचा विळखा तालुक्याला पडल्याचे स्पष्टपणे जाणवते. लोकांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचा अवलंब करण्यासाठी नागरीक पुढाकार घेत नसल्याचे दिसते. मास्क वापरण्याबाबतही लोकांची उदासिनता कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला कारणीभूत ठरत आहे.
परभणी तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनासह परभणी महापालिका ही सातत्याने जनजागृती करत आहे. महापालिकेच्यावतीने शहरात पाच ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी सेंटर उभारले आहेत. या सेंटरवर नागरीकांना मोफत आरटीपीसीआर चाचणी करून दिली जात आहे. महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांना कोरोनाची चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिका व पोलिसांच्यावतीने परभणी शहरात व शहरात येणाऱ्या नाक्यावर मास्क तपासणीसाठी पथके कार्यान्वीत केली आहेत. या पथकाद्वारे मास्क परिधान न करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील चौका - चौकात पथके स्थापन केली आहेत. शहरातील बसस्थानकांवर मात्र मास्कची कुणीही विचारपुस करत नसल्याचे चित्र दिसते. एसटी बस मध्ये चढणाऱ्या प्रवाश्यांना ना वाहक हटकतो ना चालक हटकतो त्यामुळे सर्रास विनामास्कचे प्रवाशी एसटी बस मध्ये दिसून येत आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात 23 ठिकाणी कोविड सेंटर आहेत. यात काही सरकारी तर काही खासगी रुग्णालयाचा समावेश आहे. परंतू सर्वाधिक लोक होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सध्या लग्नाच्या तारखा नसल्या तरी आता पर्यंत झालेल्या लग्न सोहळ्यामध्ये नियम धाब्यावर बसविण्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना प्रशासनाच्यावतीने
आर्थिक दंड ही लावला आहे. परभणी शहरात सध्या तीन कॉलन्या कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. पंरतू या कॉलन्यामध्ये लोकांचा सर्रास वावर दिसूत येतो. एकंदराच परभणी तालुक्याचा विचार केला तर परभणी शहरात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. सरकारी कोविड सेंटरमध्ये लोकांना असुविधांचा सामना करावा लागतोय हे मात्र खरे आहे.
विनामास्क फिरणाऱ्यावर कठोर कारवाई आवश्यक
दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आयुक्त देविदास पवार यांनी लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक त्रिसुत्रीची जनजागृती करण्यासाठी शहरातून फेरी मारली. एक आयएएस अधिकारी रस्त्यावर पायी चालत लोकांना विनंती करतो आहे हे पाहूनही लोकांच्या मानसिकतेमध्ये फरक दिसून आलेला नाही. त्यामुळे महापालिका व पोलिस यंत्रणा मिळून विनामास्क वावरणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.