file photo 
मराठवाडा

परभणीत पुन्हा काळोखमय वातावरण

कैलास चव्हाण

परभणी : मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झालेला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, कधी काळोख तर कधी पावसाच्या हलक्या सरींची हजेरी. यामुळे हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. सोमवारी (ता.१०) देखील सकाळपासून परभणी आणि परिसरात काळोख पसरला काही भागात रिमझिम सरींनी हजेरी लावली आहे.
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस हजेरी लावत आहे. सतत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झालेली आहे. हिवाळ्यात पावसाळा अशी स्थिती झाली आहे. दररोज आभाळ भरुन येत आहे. दिवसभर सुर्यदर्शन होत नसल्याने काळोखमय वातावरण तयार झाले आहे.


 त्यात थंडगार वारे सुटत आहेत. त्याचा परिणाम म्हणून हुडहुडी भरली आहे. शुक्रवारपासून परभणी शहरासह जिल्ह्यात आभाळ भरुन येत आहे. रविवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण राहीले. मागील अठवड्यात जिल्ह्यात काही भागात पाऊस झाला होता. त्यानंतरही वातावरण कायम आहे. सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान, काळेकुट्ट ढग जमा झाल्याने काळोख पसरला होता. दुपारी १२ वाजेपर्यंत सुर्यदर्शन झाले नाही. शहराच्या मध्यभागासह जिंतूर रस्त्यावरील भागात पहाटे भुरभुर स्वरुपाचा पाऊस झाला.

पिकांच्या नुकसानीची भिती
सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. हरबरा, ज्वारी, गहुही पिके जोमात आहेत. तर, तुर या पिकाची काढणी सुरु आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा परिणाम या पिकांवर होत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरबरा आणि ज्वारी पिकावर अळ्यांनी हल्ला केला आहे. गव्हाची देखील वाढ खुंटली आहे.

.....साथीचे आजार वाढले
सततच्या ढगाळ वातावरणा परिणाम म्हणून लहान मुले आणि वयोवृध्दांना विविध आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. आभाळामुळे अस्थमा असणाऱ्या रुग्णांना त्रास वाढला आहे.

...विद्यापिठाने दिला होता इशारा
मराठवाड्यात ता. ९ ते ११ या दरम्यान, ढगाळ वातावरण राहून काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने  दिला होता. त्याप्रमाणे ढगाळ वातावरुन राहुन काही भागात अतिशय हलक्या सरींनी हजेरी लावली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT