corona 
मराठवाडा

Parbhani Breaking ; सहा पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर, रुग्ण संख्या ७५ 

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २९) दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील एका साठ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला तर रात्री नऊच्या सुमारास सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ज्यात पूर्णा येथील दोन, गंगाखेड एक, मानवत एक, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील एक व जिंतूर येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. 

परभणी जिल्ह्यात मुंबई येथील पनवेलमधून वाघी बोबडे येथील व्यक्ती त्याच्या कुटूंबियासह (ता.१५) मे रोजी दुपारी वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथे आला होता. बुधवारी (ता.२७) त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे परभणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

मुंबईहून चार जण परतले होते
शुक्रवारी (ता.२९) दुपारी या स्वॅब तपासणीचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयास प्राप्त झाला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. दरम्यान, कोरोना बाधित व्यक्तीसोबत मुंबईहून त्यांची पत्नी, मुलगा इतर एक जण असे चार व्यक्ती आले होते. त्यातील मुलगा व गाडीचालक परत मुंबईला निघून गेले.

रात्री सहा अहवाल पॉझिटिव्ह 
शुक्रवारी सायंकाळी ८७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात पूर्णा येथील दोन, गंगाखेड एक, मानवत एक, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील एक व जिंतूर येथील एकाचा समावेश आहे.   

आयुक्तांनी घेतला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
परभणी : महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी (ता. २८) घेतलेल्या सर्व विभागप्रमुख, डॉक्टर यांच्या बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध, उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या विलगीकरण केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेत झालेल्या या बैठकीत आयुक्त श्री. पवार यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रुग्णांच्या सुविधांचा आढावा घेऊन तेथे प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. या इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची, सांडपाणी, स्वच्छता, सॅनिटायझर व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले. सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, सुधाकर किंगरे, अल्केश देशमुख, मुंतजिबखान, करण गायकवाड यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. होम क्वारंटाइन केल्यानंतर नागरिक फिरू शकतात, त्यांनी घरात राहावे यासाठी त्या परिसरात सहायक आयुक्त, आरोग्य विभागातील कमर्चाऱ्यांनी भेटी द्याव्यात. शहरातील मुख्य चेकपोस्ट गंगाखेड रोड, पाथरी रोड, वसमत रोड या ठिकाणी बाहेरगावांहून येणाऱ्यांची माहिती घ्यावी. 

परभणी कोरोना मिटर
एकूण रुग्ण - ७५
उपचार सुरु - ७३
घरी सोडले - एक
मृत्यु - एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT