परभणी  sakal
मराठवाडा

Parbhani : परभणीतून आज धम्म पदयात्रेला सुरुवात

थायलंड येथील ११० भिक्खूंचा सहभाग

राजेश नागरे

परभणी : देशात पहिल्यांदाच थायलंड येथील ११० भिक्खूंच्या उपस्थितीत परभणी ते चैत्यभूमी दादर अशी ऐतिहासिक भव्य धम्म पदयात्रा प्रस्थान सोहळा मंगळवारी (ता. १७) सकाळी ११ः३० वाजता ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथे पार पडणार आहे.

या निमित्त बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन होणार असून, भिक्खूंची धम्मदेसना होणार आहे. या धम्म पदयात्रा सोहळ्याचे आयोजन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे. धम्म पदयात्रेचे उद्‍घाटन भंते लाँगफुजी (जागतिक बौद्ध धम्म गुरू, थायलंड) यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून भंते सोंगसेन फॅटफियन (थायलंड), भंते विचीयन अबोत (श्रीराजगिर) थायलंड, भंते डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा), डॉ. भीमराव आंबेडकर, सिने अभिनेता गगन मलिक, कॅप्टन नटकिट (थायलंड), सिरीलक मैथाई (थायलंड) यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी

खासदार गणेशराव दुधगावकर, माजी आमदार विजय भांबळे, अॅड. अशोक सोनी, माजी महापौर अनिता सोनकांबळे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांची उपस्थिती राहणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर बौद्ध धम्माची वैश्विक बांधणी व्हावी, म्हणून पुन्हा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घेऊन, आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाची ऐतिहासिक धम्म पदयात्रा निघत आहे. मानवात मैत्रीचे नाते जोडणे, बुध्द धम्माच्या महान तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे, या उदात्त हेतूने ही धम्म पदयात्रा चैत्यभूमीच्या दिशेने जाणार आहे.

परभणी ते चैत्यभूमी (दादर, मुंबई) पर्यंत निघत असलेल्या या पदयात्रा प्रस्थान सोहळ्यानिमित्त भारतात प्रथमच तथागत बुद्धांचा पवित्र अस्थिकलश सुद्धा येत आहे. आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ व मान्यवरांच्या उपस्थिती धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा, तथागत भगवान गौतम बुध्द यांचा अस्थिकलश दर्शन व बुध्द मूर्ती वाटप तसेच धम्मदेसना सोहळा होत आहे. धम्म पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व धम्म अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मुख्य समन्वयक विजय वाकोडे आदींनी केले आहे.

कार्यक्रमासाठी भव्य मंडप

भव्य धम्म पदयात्रानिमित्त शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. धम्म पदयात्रेचे आयोजक तथा निमंत्रक सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मुख्य समन्वयक विजय वाकोडे, समवेत कोअर कमिटीचे डॉ. भगवान धूतमल, भीमराव शिंगाडे आदींनी सभामंडपाची सोमवारी पाहणी केली.

भारतीयांना न्याय देणारे संविधान शक्तीशाली करण्यासाठी जगात व देशात शांतता निर्माण व्हावी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी ही ऐतिहासिक धम्म पदयात्रा निघत आहे.

-सिध्दार्थ हत्तीअंबीरे, मुख्य आयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून नागरिक दाखल

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

Ajit Pawar Death : अजून विश्वास बसत नाही, सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील श्रद्धांजलीच्या फोटोसह ठेवलं स्टेटस

Baramati Plane Crash : 'ट्रॅक्टरला दोरी बांधून विमानाचे अवशेष बाजूला केले अन् उर्वरित तीन मृतदेह बाहेर काढले'; प्रत्यक्षदर्शीने सांगितली संकटाची कहाणी

Latest Marathi News Live Update : पुण्याहून कर्नाटकात जाणारा ८३ किलो गांजा पकडला

SCROLL FOR NEXT