file photo 
मराठवाडा

परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व अस्थापना पूर्वीप्रमाणे ता. दहा मेपर्यंत बंद राहणार आहेत. केवळ ज्यांना यापूर्वी सूट दिली होती अशा अस्थापना सात सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी (ता. तीन) काढत जमावबंदी आदेशाची मुदत वाढवली आहे.


देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाले असून या दरम्यान, रेड झोन वगळता अन्य झोनमध्ये काही सूट मिळणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. परंतु, परिस्थिती पाहून त्या-त्या प्रशासनास निर्णय घेण्याची मुभा दिली होती. त्यामुळे परभणी ऑरेंज झोनमध्ये असल्याने बहुतांष अस्थापनांना सूट मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, शेजारील नांदेड, हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा अगदी लगत असून धोका आहे. त्यामुळे परभणीत सूट मिळण्याची शक्यता कमी होती. अखेर प्रशासाने रविवारी आदेश काढत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

परवानगी नसणारे आस्थापना, दुकाने बंदच
जिल्हाधिकारी कार्यालयाने ता.२२ मार्च व त्यानंतर वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा कालावधी ता. दहा मेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. ज्या बाबींना, आस्थापना, अत्यावश्यक सेवांना सूट दिली होती त्या आस्थापना सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. ज्या आस्थापना, दुकाने यांना परवानगी दिली नाही ती बंदच राहतील, असे रविवारच्या आदेशात नमूद केले आहे. तसेच यापूर्वी काढलेले सर्व आदेश, सुधारीत आदेश, निर्देश ता. दहा मेपर्यंत लागू राहणार आहेत.

हेही वाचा व पहा : Video : परभणीचे ‘हे’ गाडगेबाबा देतात स्वच्छतेचा संदेश

हेही वाचा...

नव्याने ७७ संशयितांची नोंद
परभणी:
जिल्ह्यात रविवारी (ता. तीन) तब्बल ७७ संशयितांची नोंद झाली असून त्यांचे स्वॅब नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण संशयितांची संख्या ९५४ वर गेली आहे.
कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून जिल्ह्यात काटेकोर उपाययोजना केल्या जात असल्याने चांगला परिणाम दिसून येत आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी आणि कडक निर्बंधामुळे सद्यःस्थितीला जिल्हा चांगल्या स्थितीत आहे. आतापर्यंत ९५४ संशयित आढळून आले आहेत. त्यात रविवारी नोंद केलेल्या ७७ जणांचा समावेश आहे. एकूण ९१५ संशयितांचे स्वॅब घेऊन तपासले असता ८१८ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.
एक रुग्ण आढळला होतो. तो सध्या बरा होऊ घरी परतला आहे. तर ७८ स्वॅब प्रलंबित आहेत. रविवारी ७५ संशयितांच्या स्वॅबचा आहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये ७८ संशयित दाखल आहेत, तर ३५६ जणांचे विलगीकरण केले आहे. ५२० लोकांनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT