file photo 
मराठवाडा

परभणी : अखेर लोअर दूधनाच्या दोन्ही कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहोचले

विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी) : लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ( ता.०२ ) डिसेंबर रोजी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले.पाणी सोडण्यापूर्वी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी धरणाच्या  दोन्ही कालव्याला भेटी देऊन जिथे गाळ अथवा झुडुपे वाढलेली होती. ती सर्व यंत्रणा कामाला लावून तातडीने काढून घेतल्याने दोन्ही कालव्यामधून शेवटपर्यंत पाणी पोचले असल्याची माहिती धरण सुत्रांनी दिली.त्यामूळे शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण पसरले.

लोअर दुधना प्रकल्पातून सेलू,जिंतूर,मानवत व परभणी या तालुक्यातील आठ्ठावीस हजार ६९८  हेक्टर क्षेत्रास धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा लाभ मिळाला असून या प्रकल्पास शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होऊन राज्य शासनाच्या संयुक्त अर्थ साहाय्याने प्रकल्प पूर्ण झाला. यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले.या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे कालव्यात काही ठिकाणी गाळ साचून झाडेझुडुपे वाढलेली होती. कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी तातडीने संबंधित कंत्राटदारांना सांगून आणि स्वतः थांबून सर्व ठिकाणच्या अडचणी स्वतः दूर करून घेतल्या.( ता.०२ ) डिसेंबर रोजी डाव्या व उजव्या कालव्यातून २१ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.कालव्यातून काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून श्री.लांब हे दिवसा व रात्री देखील दोन्ही कालव्याच्या क्षेत्रात स्वतः फिरून पाहणी करित होते.त्यामूळे कालव्याची स्वच्छता झाल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेल पर्यंत पाणी पोहचले.सप्टेंबर,आॅक्टोंबरच्या सततच्या पावसामुळे खरिपातील मुग, सोयाबीन, कापुस या पिकांचे आतोनात नुकसान झाले.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हू , हरबरा आदी पिकांवर आहेत.लोअर दुधना प्रकल्पात तब्बल दहावर्षानंतर शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धरणाच्या दोन्ही कालव्याव्दारे (ता.०२) डिसेंबर रोजी पहिली पाण्याची पाळी सोडण्यात आली.तसेच दूसरी जानेवारी तर तिसरी फेब्रुवारी महिण्यात पाणी पाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ कि.मी. तर डावा कालव्या ६९ कि. मी. आहे.यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी पिकांना धरणातून पाणी मिळणार असल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करित आहेत.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT