file photo 
मराठवाडा

परभणी : पेडगावमधून गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुस जप्त

गणेश पांडे

परभणी : पेडगाव (ता.परभणी) येथून एकास गावठी पिस्टलसह पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (ता.22) ताब्यात घेतले.

परभणी जिल्ह्यात दिवसेदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 48 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दोन विनापरवाना पिस्टलही जप्त करण्यात आले आहेत. यावरून जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. यावर अंकुश मिळविण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरीकांमधून बोलले जात आहे. गुरुवारी (ता.21) रात्रीच शहरातून एक देशी बनावटीचे पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते. त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (ता. 22) पुन्हा एक गावठी कट्टा जीवंत काडतुसासह सापडल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.

विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांना परभणी तालुक्यातील पेड़गाव येथे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या बंदूक जवळ बाळगत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यावरून फौजदार श्री. खोले व फौजदार श्री, पवार यांनी परिवीक्षाधीन उपअधीक्षक बापूराव दडस यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहुल चिंचाने, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड़, श्री फारूकी, अजहर पटेल, विष्णु भिसे, दीपक मुदीराज, अरुण कांबळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पेड़गावात छापा टाकत जावेद खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुस जप्त केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास फौजदार भगवान जाधव हे करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT