file photo 
मराठवाडा

Video: चिंता मिटली; परभणीत ‘ही’ बॅंक देणार पैसे घरपोच

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याच बरोबर संचारबंदी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यांची ही अडचण ओळखून येथील वैश्य नागरी सहकारी बॅंकेच्या वतीने एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. ज्या ग्राहकांना बाहेर जाणे शक्य नाही अशांनी वैश्य बॅंकेच्या कोणत्याही शाखेत फोन करून कल्पना दिल्यास त्यांना घरपोच त्यांच्या एटीएमद्वारे पैसे काढून देण्याची  विनामूल्य सोय वैश्य बॅंकेच्या वतीने करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता मिटली आहे.

सध्या सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी आहे. त्यातल्या त्यात बॅंकांच्या वेळात सातत्याने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत बॅंकांच्या बाहेर पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या रांगा पाहून अनेकांच्या हृदयात धडकी बसते. दुसरीकडे एटीएमवरील सुरक्षिततेचा प्रश्नही आहेच. त्यामुळे या परिस्थितीत अनेकजण पैसे कसे काढावे या विचारात असतात. मराठवाड्यातील ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता, वैश्य नागरी सहकारी बॅंकेच्या वतीने एक उपक्रम सुरू करून बॅंक ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

असा आहे उपक्रम
बॅंकेच्या वतीने फोन करणाऱ्या ग्राहकांच्या खात्यावरून त्याला हवी असणारी रक्कम घरपोच जाऊन काढून दिली जात आहे. हा उपक्रम बॅंकेच्या ११ शाखांतून सुरू आहे. यासाठी बॅंकेने छोटी एटीएम मशीन उपयोगात आणली आहे. ज्या नागरिकांने पैशासाठी फोन केला, अशा नागरिकांचा पूर्ण पत्ता घेऊन ही मशीन व त्याने सांगितलेली रक्कम सोबत घेऊन त्या नागरिकांच्या घरी बॅंकेचा कर्मचारी जात आहे. त्या ठिकाणी त्या नागरिकाच्या समोरच त्याच्या एटीएमद्वारे त्याने सांगितलेली रक्कम वैश्य बॅंकेच्या अंकाउंटवर जमा केली जात आहे. सोबत आनलेली रक्कमही त्या नागरिकाला दिली जात आहे. हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

दिवसातून येताहेत दहा ते १५ कॉल
बॅंकेतून पैसे काढण्यासाठी वैश्य बॅंकेच्या प्रत्येक शाखेत दिवसातून दहा ते १५ वेळा व त्या पैक्षाही जास्त वेळा नागरिकांचे फोनकॉल येत असून त्या सर्वांना बॅंकेच्या या सेवेचा लाभ दिला जात आहे.


सामाजिक दायित्वातून 
लॉकडाउन व संचारबंदीमुळे होणारी लोकांची गैरसोय पाहून आमचे अध्यक्ष सुधाकरराव चिद्रवार व सर्व संचालकांसमोर आम्ही या उपक्रमाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तातडीने याला अनुमती देऊन हा उपक्रम सुरू केला. फक्त ज्या ग्राहकांना पैसे काढायचे असतील त्यांच्याकडे त्यांच्या बॅंकेचे एटीएम कार्ड आवश्यक आहे. केवळ सामाजिक दायित्वातून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.
- देविदास देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिरी, वैश्य नागरी सहकारी बॅंक, परभणी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT