file photo 
मराठवाडा

परभणी ; अवैध वाळू वाहतूक वाद पोलिस कर्मचाऱ्यांना भोवला, एसपींनी केले बडतर्फ 

गणेश पांडे

परभणी ः शासकीय सेवेत असताना हायवा टिप्पर विकत घेऊन त्याचा अवैधरीत्या वाळू वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (ता.२८) शासकीय सेवेतून बडतर्फ केले. दुसऱ्या प्रकरणातील अन्य दोघा पोलिस कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले.
 
सोनपेठ पोलिस ठाण्यातील निलंबित पोलिस शिपाई सुग्रीव धोंडिबा कांदे यांनी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी न घेता वाहन खरेदी केले. शासकीय नोकरीत असतानाही अवैधरीत्या वाळू वाहतुकीसाठी या वाहनाचा वापर केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यातूनच त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर केलेल्या विभागीय चौकशीचा अहवाल मीना यांना मिळाला. पोलिस शिपाई सुग्रीव कांदे यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश त्यांनी दिले. 

वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी स्थगित 

अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पकडून पोलिस ठाण्यात आणल्यावरून निलंबित पोलिस नाईक भीमराव हरी पवार व निलंबित पोलिस शिपाई (चालक) भगीरथ रघुनाथ जाधव यांनी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांच्याशी एकेरी भाषा वापरून वाद घातला होता. यासंदर्भात विभागीय चौकशीचा अहवाल मिळताच मीना यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी स्थगित करण्याबाबत आदेश जारी केले.  

 
सोनपेठ तालुक्यात लाखोंचा गुटखा जप्त 

सोनपेठ ः सोनपेठ पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या संयुक्त पथकाने सोनपेठ तालुक्यातील उखळी येथून तब्बल तीन लाख १८ हजार ९१० रुपयांचा गुटखा जप्त करून एकाला ताब्यात घेतल्याची कारवाई (ता.२८) रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. 
तालुक्यातील उखळी येथे एका किराणा दुकानात अवैध गुटख्याचा साठा असल्याची माहीती मिळताच एका संयुक्त पथकाने उखळी येथील दुकानात छापा टाकला. तेथील सामानाची तपासणी केली असता तेथे बंदी असलेल्या पानमसाल्यासह गुटक्याचा साठा त्यांना आढळला. त्यात एक लाख २६ हजार रुपयांचा गोवा, २७ हजार रुपयांचा रजनीगंधा पानमसाला, २९ हजार रुपयांचा विमल पानमसाला, २० हजार रुपयांचा केशरयुक्त विमल मसाला तसेच राजनिवास ५५ हजार रुपये, तर आरएमडी गुटखा दहा हजार, जाफरानी जर्दा २१ रुपये असा एकूण तीन लाख १८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. त्याचबरोबर या पथकाने तेथील एक वाहनही जप्त केले. असे एकूण पाच लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कर्मचारी सय्यद मोबीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हाद जगन्नाथ सावंत यांच्याविरूध्द सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

Bhiwandi Minor Assault Case : भिवंडीत संतापजनक घटना! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीने फ्लॅटमध्ये बोलावले अन्...

Tukaram Mundhe: विधानसभेत मोठी घोषणा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली नाही, भेसळ माफियांना धक्का!

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

Pune PWD: पुणे ‘पीडब्ल्यूडी’चा कारभार रामभरोसे! मुख्य अभियंत्याअभावी कर्मचाऱ्यांच्या मुंबईच्या फेऱ्या,अडीच महिन्यांपासून मुख्य अभियंता नाही

SCROLL FOR NEXT