Parbhani Lok Sabha 2024 Esakal
मराठवाडा

Parbhani Lok Sabha 2024: परभणीत मविआची सत्त्वपरीक्षा! भाजप, शिंदे गट व रासपत उमेदवारीवरून रस्सीखेच

Parbhani Lok Sabha 2024: शिवसेना भाजप युती असताना परभणी मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या निवडणुकीत मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीचा परिणाम आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Parbhani Lok Sabha 2024: शिवसेना भाजप युती असताना परभणी मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या निवडणुकीत मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीचा परिणाम आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ व २०१९ ला संजय जाधव यांना मतविभागणीचा फायदा झाला होता. यंदा महायुतीतील भाजप, शिंदे गट व रासपत उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे.

२०१९ चे चित्र

संजय जाधव (शिवसेना) विजयी मते : ५,३८,९४१

राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,९६,७४२

राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,९६,७४२

राजन क्षीरसागर (सीपीआय) मते : १७,०९५

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ४२,१९९

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

महाविकास आघाडीतील संजय जाधव यांची प्रचाराला सुरुवात, जाधव ‘हॅटट्रिक’वर

महायुतीत राजेश विटेकर (राष्ट्रवादी), रामप्रसाद बोर्डीकर (भाजप) व महादेव जानकर (रासप) यांची नावे चर्चेत

सीपीआयचे राजन क्षीरसागर यांची उमेदवारी घोषित

मतदार संघात १२ तालुके व सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश

हे मुद्दे प्रभावी ठरणार

जिल्ह्यात उद्योगांची वानवा, कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची गरज

परभणी - छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे दुहेरीकरणाचा प्रश्न कायम

भूमिगत गटार योजनेचा प्रश्न कायम

जायकवाडीतून सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळण्याबाबत निर्णय व्हावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT