MLA Meghna Bordikar sakal
मराठवाडा

Parbhani : ‘मविआ’च्या नेत्यांकडून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न; मेघना बोर्डीकर

भाजपमुळेच वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसह या वर्षापासूनच्या प्रवेश प्रक्रियेस केंद्र सरकारद्वारे हिरवा कंदील मिळेल, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी शनिवारी दिली. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी यासाठी पुन्हा आटापिटा करीत, फार्स करीत श्रेय लाटण्याचा सुरू केलेला प्रयत्न अक्षरशः केविलवाणा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता राज्य सरकारनेच जागा हस्तांतरीत करून दिली. त्या पाठोपाठ स्थापनेकरीता ७० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळेच या सर्व गोष्टी मार्गी लागल्या आहेत, असे बोर्डीकर म्हणाल्या. मान्यतेसह प्रवेश प्रक्रियेतील नवीन पेचप्रसंग तसेच अडथळे देखील लवकरच दूर होतील, या दृष्टीनेही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया,

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही ठोस असे आश्‍वासन दिले आहे. नवी दिल्लीतील १५ जून रोजीच्या सूनावनीतूनही त्रुटींच्या पूर्ततेबाबत खुलासे झाले आहेत. ऑनलाईनद्वारे पाहणीही झाली आहे. त्यामुळे एक-एक अडथळा दूर होत असताना महाविकास आघाडीचे नेते या प्रश्‍नांवर केवळ श्रेय लाटण्याकरीताच पुन्हा आटापिटा करीत आहेत, अशी टिका आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT