आयपीएलवर सट्टा 
मराठवाडा

परभणी : सेलूत अवैध धंद्यासह आयपीएल सट्ट्यावर लाखोंची उलाढाल; पोलिस प्रशासन घेतय झोपेचे सोंग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेलूत अवैद्य धंद्यासह आयपीएलवर सट्टा लावण्याचा धंदा जोरात सूरु असून लाखोंची उलाढाल होत आहे. मात्र याप्रकाराकडे सेलू पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याची चर्चा सेलूत चांगलीच रंगत आहे.

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेलूत अवैद्य धंद्यासह आयपीएलवर सट्टा लावण्याचा धंदा जोरात सूरु असून लाखोंची उलाढाल होत आहे. मात्र याप्रकाराकडे सेलू पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याची चर्चा सेलूत चांगलीच रंगत आहे.

सांस्कृतीक व शैक्षणिक दृट्या संपन्न असणार्‍या सेलू शहरात अवैद्य धंदे करणार्‍यांनी सेलूकरांना चांगलेच घेरले आहे. एकिकडे गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गजन्य रोगामुळे सेलूतील नागरिक त्रस्त आहेत. याचाच फायदा अवैद्य धंदे करणारे घेत आहेत. गेल्या काहि वर्षापुर्वी आयपीएलचा सट्टा लावणार्‍या बुकी चालकांवर सेलू पोलिस प्रशासनाने चांगलाच अंकुश लावला होता. त्यात अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे आयपीएल बुकी चालकांसह इतर अवैध धंदे करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. पुन्हा आयपीएल सट्टा, अवैद्य धंदे बहाद्दारांनी चांगलेच डोके वर काढले आहे.

हेही वाचा - पुयनी बु. येथे वीज पडून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. दोन) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

शहरात सात ते आठ बुकी चालक शहरातील गजबजलेल्या परिसरात आयपीएलचा सट्टा जोरत घेत आहेत. यामध्ये शहरातील नामांकित मंडळीचा समावेश आहे. आयपीएल सट्ट्यामुळे अनेकांची घरे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकिकडे सांस्कृतीक शहरात असे अवैद्य धंदे करणार्‍यांचे चांगलेच फावत असल्याने सेलूकरांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. जुगार अड्डा, अवैध मार्गाने दारु विक्री, वाळू आदी अवैद्य धंदे जोमाने सुरु आहेत. सेलू पोलिसांकडून दुकानदार, चहावाले, दुधवाले, भाजीपाला विकणार्‍या गोरगरीबांवर अन्याय होत असल्याने या गोरगरिबांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यासह शहरात कोरोना संसर्गजन्य रोगाने चांगलेच थैमान घातले असून दररोज २५ ते ३० कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत पोलिस प्रशासन अवैध धंदे करणार्‍यांना मुक संमती देत असल्याने अवैध धंदे करणार्‍यांची व पोलिस प्रशासनाची चांगलीच मिली भगत असल्याची चर्चा सेलूकरांतून होतांना दिसत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT