file photo 
मराठवाडा

परभणी : मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश देणार नाही- संभाजी ब्रिगेड

गणेश पांडे

परभणी ः मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तिव्र झाल्या असून जो पर्यंत न्याय मिळत नाही  तो पर्यंत मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही असे सांगत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.११) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात एकत्र जमून निदर्शने केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वोच्य न्यायालयामध्ये भंकमपणे बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत परभणीत शुक्रवारी (ता.११) संभाजी ब्रिगेड कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संभाजी ब्रिगेड व अनेक मराठा संघटनांनी आंदोलने केली व उपोषणे केली.

आरक्षण मिळविण्यासाठी स्वताच्या प्राणाची आहूती दिली

आंदोलना दरम्यान मराठा युवक काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षण मिळविण्यासाठी स्वताच्या प्राणाची आहूती दिली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्य न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू होती. परंतू महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही असा आरोप संभाजी ब्रिगेडच्यावतीने शुक्रवारी करण्यात आला. मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जो न्यायमुर्ती व वकील देण्यात आले होते. त्यांना महाविकास आघाडीकडून बदलण्यात आले.

एका नटीच्या वादग्रस्त बोलण्याकडे सरकारने जास्त प्रमाणे लक्ष दिले

हे सरकार मराठा समाजावर अन्याय करीत आहे असे सांगत सर्वोच्य न्यायालयात प्रक्रिया चालू असतांना महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गर होती. पण एका नटीच्या वादग्रस्त बोलण्याकडे सरकारने जास्त प्रमाणे लक्ष दिले तसेच राज्य मंत्री मंडळाकडे अनेक मराठा आमदार असूनही एकही मराठा आमदार, मंत्री मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करीत नाही. म्हणून येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड एकाही मराठा मंत्र्याला व राज्य सरकारमधील मंत्र्याला जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आघाडी सरकारने मराठा आरक्षणाला महत्व दिलेले नाही

मराठा समाजाला फडणवीस सरकारने न्याय देण्याचे काम केले. परंतू महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाला महत्व दिलेले दिसत नाही. लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुनश्च राज्य सरकाराने प्रयत्न करावे. अन्यथा सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- बालाजी मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Dairy Farmer Success Story: आईच्या वेदनेतून जन्माला आले स्वप्न; एका अनुभवाने बदलले आयुष्य, ५० वर्षांनी बनली यशाची प्रेरणादायी यशाेगाथा..

Latest Live Updates Marathi : उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार,डेहराडूनमध्ये पूल खचल्याने वाहतूक ठप्प, शाळा बंद

अजय देवगणच्या 'चौहान'मध्ये विक्रांत मेस्सीची दमदार एन्ट्री; साकारणार खलनायकाची भूमिका

Mumbai: अय्यंगार बेकरीवर FDAची धाड! केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, दोन मुलींसह नगरसेविका आजारी

SCROLL FOR NEXT