file photo 
मराठवाडा

परभणी महापालिकेतील  कोट्यवधींची यंत्रसामुग्री धूळखात !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : एकीकडे नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी महापालिका यांत्रिकी विभागाच्या मागणीनुसार कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करत असताना त्या यंत्रांचा वापर मात्र, योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे जेसीबी, रुग्णवाहिका आदी यंत्रसामुग्री धूळखात पडून आहे.
परभणी महापालिकेच्या यांत्रिकी विभागामार्फत काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता ही सर्व यंत्रे नागरिकांना आवश्यक व वेळेवर सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी खरेदी करण्यात आलेली असताना ती यंत्रे एक तर सडवली जात आहेत, नाही तर एजन्सीच्या घशात घालण्याचे प्रयत्न होतांना दिसून येत आहेत. नुकतेच पालिकेने मोठा खर्च करून दोन जेसीबी यंत्र खरेदी केली आहेत. त्या यंत्रांचे कुशल चालक, दुरुस्तीची तकलादू कारणे समोर करून ती यंत्रे एखाद्या (ठरलेल्या) एजन्सीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतांना दिसून येत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. नेहमीप्रमाणे निविदा येतच नाहीत, आल्या तर तांत्रिक कारणाने त्या रद्द केल्या जातात व नंतर गरज म्हणून एखाद्या एजन्सीच्या गळ्यात माळ टाकली जाते. असे प्रकार सातत्याने घडून येतांना दिसून येतात.

लाभ तपासण्याची गरज 
वास्तविक पाहता चालक व देखभाल दुरुस्तीची कामे सातशे कोटींचे अंदाजपत्रक असलेली पालिका करू शकत नाही, हेच मोठे कोडे आहे. एकदा एजन्सीकडे हस्तांतरीत केले की कितीही नियम अटी लावा, पालिकेला पाहिजे तेव्हा ते यंत्र मिळण्याची खात्रीच नाही. यापूर्वीदेखील पालिकेच्या मालमत्ता एजन्सीला दिलेल्या आहेत. त्या परत घेतांना कशा स्थितीत होत्या व महापालिकेला त्यापासून किती लाभ झाला, हे तपासण्याची गरज आहे.

हेही वाचा : लॉकडाउनने भट्टीच पेटली नाही; कुंभार व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

अनेक घंटागाड्या बंद पडल्या
शहरात खासगी रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाही. परंतु, पालिकेच्या रुग्णवाहिकेला मात्र ग्राहकच नसतात. आले तर चालक नसतो, अशी परिस्थिती आहे. शौचालयांचे टॅंक उपसण्यासाठी दोन यंत्र असून त्याचीही तीच गत. त्यावरीलच काही कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी आलेल्या ग्राहकांना विविध कारणे सांगून खासगी कंत्राटदाराकडे पाठवतात. पालिकेच्या अनेक घंटागाड्या बंद पडल्या आहेत. त्याची दुरुस्ती एजन्सीकडे आहे, परंतु या विभागाच्या दुर्लक्षाने त्यादेखील निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT