parbhani news  sakal
मराठवाडा

Parbhani News : शिक्षणासाठी मुलींची पायपीट;दिडशेवर मुली शाळेत जातात चालत

या विद्यालयात परिसरातील उखळद, बाभळी, नवागड व पिंपरी देशमुख गावातील शेकडो विद्यार्थिनी शिक्षणासाठी ये-जा करतात.

सकाळ वृत्तसेवा

परभणी - मानव विकास योजनेच्या जिल्ह्यात ६० बसेस सुरु आहेत. असे असले तरी तालुक्यातील उखळद, बाभळी, नवागड, पिंपरी देशमुख या गावांतील दिडशेवर मुलींना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

नवागड येथे श्रीमती रतनबाई चंद्रकांतराव सोनटक्के विद्यालय आहे. या विद्यालयात परिसरातील उखळद, बाभळी, नवागड व पिंपरी देशमुख गावातील शेकडो विद्यार्थिनी शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यामध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींची संख्या दिडशेपेक्षा अधिक असून, त्यांना दररोज पायपीट करावी लागते.

कुणी सायकलवर, कुणी खासगी वाहनाने तर कुणी पायपीट करीत विद्यालय गाठतात. यातच परिसरातील रस्त्यांची देखील मोठी दुरवस्था झालेली आहे. तसेच रस्त्यावरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. ही वाहने भरधाव वेगाने धावतात, त्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातच काही गावच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी ऊस आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य पालकांनी विद्यार्थिनींची शाळा देखील बंद केल्याचे सांगण्यात येते.

अगोदर परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये अशा परिस्थितीमुळे हे बालविवाह वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. या प्रकरणी शिक्षणाधिकारी कार्यालयाने दखल घेण्याची गरज असून तत्काळ मानव विकासची बस सुरु करणे गरजेचे आहे.

विद्यार्थी हक्क कृती समितीची मागणी

विद्यार्थी हक्क कृती समितीचे रितेश ऊर्फ दर्शन देशमुख व भूषण सुकेशनी वामनराव यांनी मंगळवारी (ता.२९) जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. नवागड येथील शाळेत जाण्यासाठी मुलींना मोठा त्रास होत असून, तत्काळ बससेवा सुरु करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. अशीच मागणी रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांनीही केली आहे.

मानव विकासच्या बससाठी गेल्या दोन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. यावर्षी एक बस सुरु करण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु, बस मात्र सुरु झाली नाही. प्रशालेत परिसरातील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी येतात. बस नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत असून, याचा शिक्षणावर परिणाम होऊ लागला आहे. काहींनी शाळा देखील बंद केली आहे. त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-देवानंद अंभोरे, प्राचार्य, श्रीमती र. चं. सोनटक्के मा. व उ. मा. विद्यालय, नवागड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT