file photo 
मराठवाडा

परभणीत आखुड बोटांचा सर्पगरुड !

गणेश पांडे

परभणी : येथील पक्षीमित्रांना जिल्ह्यात सर्पगरुडाचे दर्शन मंगळवारी (ता.१०) झाले. जिल्ह्यात सर्पगरुड दिसण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा पक्षीमित्रांनी केला आहे. याला आखूड बोटाचा सर्पगरुड देखील संबोधले जाते.
 
परभणी जिल्ह्यातील पक्षीमित्र व अभ्यास सातत्याने जिल्ह्यातील, परराज्यातील व परदेशातून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या पक्षाची नोंद ठेवत असतात. त्याच बरोबर त्यांचा अभ्यासही करतात. मंगळवारी (ता.१०) येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाच्या परिसरात पक्षीनिरीक्षण करतांना पक्षीमित्रांना आखूड बोटांचा सर्पगरुड निदर्शनास आला. पक्षीमित्रांची ही मोहिम मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत राबविण्यात आली. तेव्हा सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा सर्पगरुड पक्षीमित्रांना दिसला. हा सर्पगरुड प्रथमच जिल्ह्यात आला असल्याचा दावा पक्षीमित्रांनी केला आहे. 

विद्यापीठात पक्ष्यांसाठी अधिवास
परभणी येथे पक्षीमित्र अनिल उरटवाड, श्याम टाक, गणेश कुऱ्हा, माणिक पुरी, डॉ.विनायक कुलकर्णी, संजय बगाळे यांना पक्षीनिरीक्षण करतांना आखुड बोटांचा सर्पगरुड (Short toed Snake Eagle) हा पक्षी प्रथमच परभणी जिल्हयात आढळुन आला. विद्यापीठात पक्ष्यांसाठी उत्तम अशा अधिवास असल्यामुळे शिकारी पक्ष्यांची संख्या बरी आहे. शिकारी पक्ष्यामध्ये शिक्रा, घार, ब्राम्हणी घार, पिंगळा, घुबड आदी शिकारी पक्षी आढळुन येतात. शिकारी पक्ष्यांना शिकार करण्यासाठी इतर छोटे -  छोटे पक्षी मुबलक प्रमाणात आहेत. त्यात मंगळवारी आणखी आखुड बोटांच्या सर्पगरुड या शिकारी पक्ष्यांची भर पडली. 


१४७ वेगवेगळ्या पक्षांच्या नोंदी 
या पक्षाच्या दर्शनाने पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परभणीच्या पक्षीमित्रांनी जिल्ह्यात आजपर्यत आढळलेल्या १४७ वेगवेगळ्या पक्षांच्या नोंदी केल्या आहेत. त्यात मंगळवारी (ता.१०) निदर्शनास आलेला सर्पगरुडाची ही नोंद झाली आहे.  सर्पगरुड सहसा मोकळ्या जागेवर किंवा कमी झाडे - झुडपे असणाऱ्या प्रदेशात सातत्याने फिरत असतो. घनदाट जंगल परिसरात त्याचे वास्तव्य कमी असते अशी माहिती पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी दिली.


स्थानिक रहिवाशी पक्षी 
हा पक्षी माळराने, विरळ जंगले, समुद्र किनारे या ठिकाणी आढळुन येतो. हा पक्षी भारताचा स्थानिक रहिवाशी पक्षी आहे. हा घारी पेक्षा थोडा मोठा असतो. हा काळा भुरकट असुन छाती जवळ पांढरा असतो. मुख्यत्वे साप हे त्याचे अन्न आहे. इतर  उंदीर, ससे, पक्षांचीही तो शिकार करतो. डिसेंबर ते मार्च हा याचा विणीचा काळ असतो.
- अनिल उरटवाड, पक्षीमित्र, परभणी
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT