Parbhani sakal
मराठवाडा

Parbhani : रस्त्यांची डागडुजी रखडल्याने परभणीकर त्रस्त

सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही अपेक्षा ठरल्या फोल

सकाळ वृत्तसेवा

परभणी : पालिकेने शहरातील प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यामुळे नागरिकांच्या आशा- आकांक्षा पल्लवीत झाल्या होत्या. यातच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिलेल्या रस्त्यांच्या डागडुजी करण्याच्या आदेशाकडेही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आशा- आकांक्षा आता फोल ठरल्या आहेत.

शहरात सहाशे किलोमीटर पेक्षा अधिक रस्त्यांचे जाळे असून, तुकडे- तुकडे वगळता रस्त्यांचा मोठा बॅकलॉक शिल्लक आहे. पालिकेची आर्थिक स्थिती तर डबघाईला आलेली असून, पालिका कर्मचाऱ्यांचे वेतनच नियमित देऊ शकत नाही. तिथे विकास कामांचे काय? दुसरीकडे खड्डेमय रस्ते पावसाळ्यात पाण्यामुळे तर अन्य मोसमात धुळीमुळे जनता त्रस्त झालेली आहे.

मध्यंतरी पालिकेने रस्त्याची कैफियत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मांडली होती. त्यांनी देखील महापालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता असल्यामुळे शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या काही रस्त्यांचा दर्जा उन्नत करून ते रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा व त्यास निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री. चव्हाण यांच्या हस्ते शहरात जागोजागी या रस्त्यांचे मोठ्या थाटामाटात भूमिपुजनाचे कार्यक्रम झाले. रस्ते सार्वजनिक बांधकाम

विभागाकडे गेल्यामुळे नागरिकांच्या आकांक्षा देखील पल्लवीत झाल्या. लवकरात- लवकर चांगले रस्ते मिळतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती.

महापालिकेने रस्ते हस्तांतरित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवून त्यास शासनाकडून तत्काळ मंजुरी घेणे अपेक्षीत होते. परंतु, येथेही या विभागाचा तुघलकी व लालफितीचा कारभार दिसून आला. यातच ३० जून पासून शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाले, त्यांनी आघाडी शासनाच्या सर्व निर्णयांना व निधी वाटपास ब्रेक लावला. शहरातील रस्ते कामाच्या मंजुरीची प्रक्रिया देखील त्यात अडकल्याचे दिसून येते.

महापालिकेने केले हात वर

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते वर्ग झाल्यामुळे महापालिकेने देखील त्याकडे,नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यापूर्वी पालिकेने काही रस्त्यांची दुरुस्ती केले. तर, काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक सामाजिक संघटना व समाजसेवी नागरीकांनी आंदोलने केली. परंतु, याची दोनही विभागांनी दखल घेतली नसल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकाऱ्यांची पायपीट ठरली फोल

शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ता. २५ ऑगस्ट रोजी शहरात तीन-चार तास पायपीट करुन रस्त्यांची पाहणी केली. बांधकाम होईल तेव्हा होईन किमान नागरिकांसाठी या रस्त्यांची किमान डागडुजी करावी, अशा सूचना वजा आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले होते. परंतु, त्यानंतरही दोनही विभागाकडून काहीही हालचाली झालेल्या दिसून येत नाही.

सा.बां. विभागाकडे वर्ग केलेल्या

या रस्त्यांची दुरवस्था

शासकीय रुग्णालय ते जुनी दर्गा कमान

उड्डाणपूल ते कौडगाव रेल्वे गेट ते सोन्ना

लोहगाव रेल्वे गटे ते गंगाखेड नाका ते राष्ट्रीय महामार्ग

बाळासाहेब ठाकरे नगर कमान ते पारदेश्वर मंदिर ते नांदखेडा रोड

महाराणा प्रताप चौक ते नानलपेठ ते धार रोड

जायकवाडी कॅनॉल ते खंडोबा बाजार रस्ता

गुलशन फंक्शनल हॉल ते वांगी रस्ता

मोठा मारुती ते उघडा महादेव मंदिर रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

Baby Care After Diwali: दिवाळीनंतर लहान बाळांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या काही खास सोप्या टिप्स!

रितेश जेनिलियाची यंदाची दिवाळी लातूरमध्ये नाहीतर मुंबईत, नवऱ्याने मुलासोबत स्वत: केल बायकोचं औक्षण

Panchang 24 October 2025: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT