file photo
file photo 
मराठवाडा

‘कोरोना’ही थांबेना अन् होरपळही...

कैलास चव्हाण

परभणी : यंदाच्या वर्षात सलग दुसऱ्या दिवशी ४५ अंशांच्या पुढे राहिला. पारा वाढल्याने उष्णतेच्या लाट सुरू झाली असून अख्खा जिल्हा होरपळून निघत आहे. आधीची कोरोना, त्यात उष्णतेचा कहर सुरू झाल्याने नागरिकांची घालमेल आणि हतबलता वाढली आहे. एकीकडे कोरोना थांबायचे नाव घेत नाही अन् दुसरीकडे सूर्यदेखील कोपला आहे. मंगळवारी ४५.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

परभणी जिल्हा मागील काही वर्षांत वरचेवर तप्त होत आहे. हिवाळ्यात तापमान तीन अंशांवर आणि उन्हाळ्यात ४६-४७ अंशांवर जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे तापमान चक्र बदलून गेले आहे.
गोदावरी, दुधना, करपरासारख्या नद्यांच्या खोऱ्याने अन् काळ्याशार सुपिक जमिनीने समृद्ध असलेला जिल्हा सतत दुष्काळात भरडत आहे. शहरासह ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई ठरलेली आहे. येलदरी, लोअर दुधना, करपरा, सिद्धेश्वर, जायकवाडी अशा धरणांचे लाभक्षेत्र असूनही जिल्ह्याची पाणीटंचाईपासूनदेखील सुटका झालेली नाही. ज्याप्रमाणे दुष्काळ एक समस्या बनली आहे तशीच तापमान वाढ हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गतवर्षी झाला होता मोठा विक्रम....
गतवर्षी उष्णतेने चांगलाच कहर केला होता. मागील ४० वर्षांच्या काळात या जिल्ह्याने वाढलेले सलग तापमान अनुभवले नव्हते. गतवर्षी मात्र, भंयकर स्थिती जिल्हाने अनुभवले होते. गतउन्हाळ्यात ता. २२ मार्चपासून ४१ अंशाच्या पुढे तापमान गेले होते. सलग ६९ दिवस जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली आलाच नाही. त्यामुळे भूतो न भविष्यती असा ता. २८ एप्रिल २०१९ रोजी तापमानाने विक्रम केला होता. या दिवशी तापमान ४७.०२ अंशांवर होते. तसेच गतवर्षीच्या मे महिन्यात ४५ ते ४६ अंशांवर सलग १५ दिवस तापमान राहिले होते. गतवर्षी उष्णतेमुळे चार बळी गेले होते.

अवकाळी पावसामुळे यंदाचा उन्हाळा उशिरा
दरवर्षीच्या तुलनेत यंदा तापमानाने उशिराने आपला रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. यंदा उशिरापर्यंत पावसाळा राहिला. तसेच हिवाळ्यातदेखील पाऊस पडत होता. अधूनमधून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस येत असल्याने या वर्षी मार्च महिन्यात उन्हाळा जानवला नाही. तसेच एप्रिल महिन्यातदेखील उन्हाची तीव्रता अधिक नव्हती. मे महिन्यातदेखील सुरवातीला तापमान वाढले नव्हते. अवकाळी पावसामुळे यंदाचा उन्हाळा उशिरा सुरू झाला आहे. आता मात्र मागील अठवड्यापासून तापमान चांगलेच वाढत आहे. चार दिवसांत पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. तर सोमवारी पारा ४६, तर मंगळवारी ४५.५ अंश तापमान होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT