सेलू परभणी
सेलू परभणी 
मराठवाडा

परभणी : सेलूतील दायमा कुटुंबाने केली कोरोनावर मात

विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी ) : शहरातील विद्यानगर परिसतील रहिवाशी दायमा कुटुंबातील बारा जणांच्या अख्ख्या कुटुंबाने कोरोनासमोर हार न मानता आत्मविश्वासाच्या बळावर घरी राहूनच नियमित औषधोपचार व योगासनाच्या माध्यमातून 'कोरोना' या संसर्गजन्य रोगावर यशस्वी मात केली.

सेलू शहरातील विद्यानगर परिसरातील दायमा कुटूंबातील पियूष दायमा व दीपक दायमा या दोघांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत असल्याने (ता. १७) रोजी त्यांची कोरोना चाचणी केली. त्यात दोघेही पॉझिटिव्ह आले. त्यानंतर कुटुंबातील राखी दायमा, बबिता दायमा, शुभम दायमा, रामेश्वर दायमा, दुर्गा दायमा, रतन दायमा, नंदकिशोर दायमा, कीर्ती दायमा, सूरज दायमा, कोमल दायमा या दहा सदस्यांचा कोरोनाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंबच बाधित झाल्याने घरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु सर्वांनी विचार विनिमय करून घरीच नियमित औषधी घेऊन कोरोनावर मात करण्याचा निश्चय केला. शासकीय कोविड सेंटरमधून दिलेली औषधी वेळेवर घेतली. त्याचबरोबर योगासने व टी. व्ही. वरील मनोरंजनाचे कार्यक्रम पाहत कोरोना आजाराला मनातून वेगळे करित हे कुटुंब (ता. २७) एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाले. सद्य: स्थितीत या कुटुंबातील सर्व सदस्यांची तब्येत ठणठणीत आहे. विशेष म्हणजे वयोवृध्द रामेश्वर दायमा (वय ८५) यांना मधुमेह तर दुर्गा दायमा व रतन दायमा या दोघांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असतांनाही या तिघांनी हिंमतीने कोरोनाचा सामना करत कोरोनावर विजय मिळवला.

हेही वाचा - नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

घरातील सर्व जण सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायचे,त्यानंतर गरम पाण्याची वाफ घेणे, चहा व दुपारी जेवण व औषध घेणे व आराम करणे, सायंकाळी चार वाजता फलाहार, त्यानंतर टी.व्ही.वरील मनोरंजक कार्यक्रम पाहणे, सायंकाळी ६.३० वाजता छतावर जाऊन योगासन करणे व रात्री ८:३० वा जेवण, औषध व गरम पाण्याची वाफ घेऊन झोपणे अशी दायमा कुटुंबियांची दिनचर्या होती.

ऑक्सिजन लेव्हल तपासून एका वहीत नोंद करीत होतो.प्रत्येकांना त्यांची ऑक्सिजन लेव्हल दाखवत असल्याने उपचाराची दिशा कशी आहे हे प्रत्येकाला समजले. त्यातून आत्मविश्वास वाढत गेला.

- दीपक दायमा, सेलू

आम्ही चार फुटाच्या अंतरावर राहत होतो. मास्क व सॅनिटायझर वापरत होतो. त्यामुळे आमच्यातील हिंमत वाढली.सर्वांना सकस जेवण वेळेवर बनवून देण्याची जबाबदारी पार पाडली.

- राखी दायमा, सेलू

नियमित औषध घेतले व योगासन केले. आहारात पालेभाज्यांचा समावेश करून सकस आहार नियमित घेतला. रक्तदाब व मधुमेहाच्या औषध घेण्यावर विशेषतः लक्ष दिले.

- रामेश्वर दायमा, सेलू

सर्वांना औषधोपचार वेळेवर देण्याची जबाबदारी मी घेतली होती. ती वेळेवर पार पाडली. याबाबत कोविड सेंटरमधील आरोग्य विभागाशी संपर्क ठेवत होतो. खासगी डॉ.विजेंद्र नागोरी यांचेही मार्गदर्शन मोलाचे राहिले.

- नंदकिशोर दायमा.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT