Parbhani water overflowed on roads Municipal employees strike not settled sakal
मराठवाडा

परभणी : नाल्या तुंबल्या, रस्त्यांवर पाणी; संपावर तोडगा निघेना

परभणीत तेराव्या दिवशीही पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाचा मंगळवारी तेरावा दिवस असताना देखील या संपावर तोडगा निघला नाही. आता संपाचा परिणाम जाणवू लागला असून, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महानगरपालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी ता. पाच मे पासून बेमुदत संप पुकाराला असून, त्यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. मुख्य म्हणजे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील १०० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. रस्त्यांची स्वच्छता, नाल्या काढणे ही कामे स्वच्छता कामगारांवर अवलंबून आहेत.

त्यामुळे ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या असून, रस्त्यांवर पाण्याची डबकी तयार झाली आहेत. अनेक ठिकाणी घाणेरडे पाणी अंगावर घेऊनच नागरीकांना ये- जा करावी लागत असल्याचे चित्र आहे. तसेच शहरातील अनेक रस्ते धुळ व कचऱ्यांनी व्यापले आहेत. प्रभाग समित्यांची कामे देखील ठप्प झालेली असून, नागरीकांना विविध परवाने घेण्यासाठी घिरट्या घालाव्या लागत आहेत.

संपावर तोडगा कधी?

शासनाच्या नगरविकास विभागाने आस्थापना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा प्रश्न रखडला आहे. महापालिकेने सुरवातीला ८० टक्के पेक्षा अधिक खर्च दाखवला होता. कालांतराणे या खर्चात कपात करण्यात येऊन तो ५५ टक्क्यावर आणला असल्याचे सांगीतले जाते. परंतु, आस्थापनाची खर्चाची अट ३५ टक्क्यांची असून, विशेष सवलत म्हणून ती ५१ टक्क्यावर आणता येते. परंतु, दाखवलेला खर्चाची टक्केवारी अधिक असल्याने हा तिढा सुटता सुटत नाही व कर्मचारी देखील आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे संप सुरुच आहे. मध्यंतरी आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनीया सेठी यांची भेट घेतली होती. यावेळी खर्च कमी करण्याचे हमीपत्र देखील पालीकेने दिले असल्याचे समजते. परंतु, शासनाकडून अद्याप हिरवी झेंडी मिळाली नसल्याचे तिढा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Crime: वहिनी मध्यरात्री खोलीत शिरली, आतून दरवाजा बंद केला, नंतर झोपलेल्या दिराचे गुप्तांग कापले अन्...; कारण काय?

Police Commemoration Day : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली, उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

SCROLL FOR NEXT