स्वप्निल सुंदर धोंडगे 
मराठवाडा

‘तान्हाजी’ चित्रपटात परभणीचा तरूण

सकाळ वृत्तसेवा

परभणी : काही दिवसापासून बॉलीवुडमध्ये गाजणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात दिग्गज कलावंताबरोबर परभणीच्या स्वप्निल सुंदर धोंडगे या तरूण कलावंताने सुध्दा ‘सत्या’ या छोटाश्या भुमिकेतून आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक सुंदर धोंडगे यांचा स्वप्निल हा मुलगा वसमत रस्त्यावरील गीतांजली विद्यालयात त्याने सातवीपर्यंत तेथून एकता कॉलनीतील गांधी विद्यालयात दहावीपर्यंत पाठोपाठ श्री शिवाजी महाविद्यालयात बी. ए. तृतीय वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले. तेथून त्याने स्पर्धा परीक्षाच्या निमित्ताने पूणे गाठले. पण नाटकाची आवड होती. मालिकातील कामासाठी ऑडीशन देणे चालू होते. पूण्यात समर्थ अकादमी या थिअटर ग्रुपच्या माध्यमातून एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा व व्यावसायिक नाट्य सुध्दा सुरू केली. जय मल्हार या मालिकेसाठी ऑडीशन दिले होते. त्या मालिकेत सुध्दा छोटी भूमिका केली. 

क्राईम पेट्रोलमध्ये पोलिसाची भुमिका
तो पुढे मुंबईत दाखल झाला. तेथून त्याने हिंदी मालिकामध्ये विशेषतः क्राईम पेट्रोलमध्ये पोलिसाची भुमिका बजाविण्यास सुरूवात केली. आणि एक दिवस त्यास अजय देवगण यांच्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटासाठी संधी आली. सत्या या भुमिकेत त्याची निवड झाली. आणि त्याने अजय देवगण, सैफ अली खान, ओम राऊत या दिग्गज कलाकाराबरोबर काम करण्याची सुवर्ण संधी साधली. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य जननी जिजामाता,  अवधुत गुप्ते निर्मित कान्हा, शेंटीमेटल वगैरे मधून तो झळकत आहे. 


परभणीने दिले अनेक दिग्गज कलावंत
परभणी शहर हे साहित्य नगरी म्हणून पूर्वीपासूनच परिचित आहे. हळूहळू या नगरीचे नाव आता नाट्य व चित्रपट क्षेत्रातही झळकत आहे. प्रसिध्द नाट्यकलावंत संकर्षण कऱ्हाडे, अजिंक्य राऊत यासह संगीतकार रोहित नागभिडे व इतर अनेक जणांनी नाट्य व चित्रपटात आपली चुणूक दाखवून परभणी शहराचा नावलौकीक केला आहे. 
या यादीत आता स्वप्नील धोंडगे याचे नावदेखील आले आहे. या तरूण व हरहुन्नरी कलाकारांमुळे परभणी आता साहित्यासह नाट्य चित्रपट क्षेत्रातही ओळखली जाऊ लागली आहे. परभणी आणखी अनेक नाट्य कलावंत आहेत त्यांनी त्यांची प्रतिभा जगासमोर आणली आहे. यामुळेच परभणी हे नाव देशाच्या नकाशावर आता ठळकपणे दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT