Beed News 
मराठवाडा

...आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि. बीड) : येथील पंचायत समितीच्या सभापतीची निवड सोमवारी (ता. 30) होणार असून आमदार धनंजय मुंडे यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसीसाठी राखीव आहे. ओबीसी गटातील अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे आज ठरणार आहे. 

सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत 16 डिसेंबरला काढण्यात आली. यामध्ये सभापतीपद ओबीसीसाठी राखीव सुटले आहे. पंचायत समितीवर आमदार धनंजय मुंडे यांची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 12 पैकी नऊ सदस्य निवडून आले आहेत. याअगोदर पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना मोहन सोळंके व उपसभापतीपदी बालाजी मुंडे यांची निवड झाली होती.

या वेळी आरक्षण सोडतीत ओबीसीसाठी सभापतीपद सुटल्याने बालाजी मुंडेंसह ऊर्मिला शशिकांत गित्ते, मीरा वसंत तिडके, रेणुका भास्कर फड, सुषमा ज्ञानोबा मुंडे यांच्यापैकी आमदार मुंडे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावर अवलंबून आहे. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती आहे.

तालुक्‍यातील जातीय समीकरणे जुळवताना त्यांनी उपनगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाचे शकील कुरेशी यांची नुकतीच निवड केली आहे. मागच्या वेळी मराठा समाजाला पंचायत समितीचे सभापतीपद, तर वंजारी समाजाला उपसभापतीपद दिले होते.

बाजार समितीच्या सभापतीपदी वंजारी समाजाच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. आता पंचायत समिती व काही दिवसांनी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड आहे. यामध्ये श्री. मुंडे कोणत्या पद्धतीने हे सर्व साध्य करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT