Payment Slip Of Professor On Wall At Badnapur Distt Jalna
Payment Slip Of Professor On Wall At Badnapur Distt Jalna 
मराठवाडा

विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्राध्यापकांना इतका आहे पगार, काॅलेजच्या भिंतीवरच लावले पगारपत्रक

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी काॅलेजमध्ये नियमित तासिका करत नाहीत. ही बाब प्राध्यापकांच्या पथ्थ्यावर पडते. काही तासिकेला विद्यार्थीच नसल्याने प्राध्यापकांना  शिकवण्याचे कामच नसते. पण, आपल्याला शिकवण्यासाठी शासन प्राध्यापकांना किती पगार देते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी नियमित तासिका कराव्या, यासाठी बदनापूर (जि. जालना) येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेतंर्गत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी काॅलेजच्या सूचना फलकावर चक्क कुण्या प्राध्यापकाला किती पगार आहे, हे जाहीर केले आहे.

बदनापूर येथे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी व विद्यार्थ्यांचा ओढा  प्राध्यापक या पदाकडे आकर्षित होण्याच्या दृष्टीने या संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी एक नवीनच प्रयोग केला.

त्यांनी या महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापकांचे मासिक  वेतनाचा एक तक्ता तयार करून तो दर्शनी भागात लावला तसेच या बोर्ड खाली विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी टीप लावली. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या  विद्यार्थ्यांना व पालकांना हा बोर्ड दिसताच अब्बब…! प्राध्यापकांना एवढा पगार असे आश्चर्य व्यक्त होताना दिसत असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्याc उपस्थिती वाढण्यात होणार  असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 
सकारात्मक परिणाम 
कुण्या प्राध्यापकाला एक लाख 78 हजार तर कुणाला एक लाख 63 हजार रुपये पगार आहे. कुणाला एक लाख 39 हजार. प्रत्येक प्राध्यापकांच्या पगाराचा हा पाच ते सहा अंकी आकडा  या काॅलेज व्यवस्थापनाने चक्क सूचना फलकावर जाहीर केला आहे. लाखोंचे हे आकडे लिहून संस्थाचालकांनी एक प्रकारे विद्यार्थ्यांना शासन त्यांच्या शिक्षणावर किती खर्च करतोय हे  दाखवून दिले आहे. शिवाय यामुळे तासिका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकांनादेखील धाक बसला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेत कुतुहल व्यक्त होऊन प्राध्यापकांच्या  पगारावर शासन एवढा खर्च करते याबाबत खमंग चर्चा होत असतानाच याचा सकारात्मक परिणाम होऊन विद्यार्थ्यांची हजेरी वाढत असल्याचे चित्र आहे.

 
नागरिकांत खंमग चर्चा
बोर्डवरील प्राध्यापकांचे वेतन बघितल्यावर बदनापूरसारख्या ग्रामीण भागातील नागरिक मात्र नवल व्यक्त करत आहेत. या प्राध्यापकांचे कमीत कमी वेतन 79000 तर जास्तीत जास्त 17,8680 एवढे वेतन दाखवण्यात आल्यामुळे जनतेच्या करातून एवढे वेतन उच्च शिक्षणासाठी शासन देत असताना हे प्राध्यापक खरोखर त्या दर्जाचे शिक्षण देतात का या बाबत खमंग चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT