phulambri market committee election chairman first woman anuradha chavan eknath shinde group dattatray karpe
phulambri market committee election chairman first woman anuradha chavan eknath shinde group dattatray karpe sakal
मराठवाडा

Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्रीत पहिल्या महिला सभापतीपदी अनुराधा चव्हाण विराजमान

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती पदी अनुराधा अतुल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे तर शिंदे गटाकडून दत्तात्रेय करपे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. सोमवारी (ता.२२) रोजी ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

सभापतीपदी, उपसभापतीपदी यांची निवड झाल्यानंतर त्यांचा आमदार हरिभाऊ बागडे व माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे, माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सत्कार केला. फुलंब्री बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती होण्याचा पहिला अनुराधा चव्हाण यांना मिळाला.

बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी पार पडली. यात भाजपने अकरा जागांवर तर शिंदे गटातील किशोर बलांडे गटाने तीन जागांवर यश मिळविले होते. सोमवारी दुपारी झालेल्या निवडणूकीप्रसंगी अप्पासाहेब काकडे, दत्तात्रेय करपे,

शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, विवेक चव्हाण, सविताताई फुके, योगेश जाधव, सर्जेराव मेटे, रोशन अवसरमल, जगन्नाथ दाढे, वरून पाथ्रीकर, माधवराव जाधव, राजेंद्र ठोंबरे, श्रीराम मस्के, अजहर सय्यद हे सर्व संचालक बैठकीसाठी हजर होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक वरून पाथ्रीकर हे हजर राहिले नाही.

निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येकी एक-एक अर्ज गेल्याने सदरील सभापती उपसभापती पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकारी विष्णू रोडगे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत भाजप व शिंदे गटाने जल्लोष केला.

कन्नड बाजार समितीवर शिंदे गटाचा झेंडा

कन्नड : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवशाही शेतकरी विकास पॅनलचे डॉ.मनोज राठोड यांची तर उपसभापतीपदी संजनाताई जाधव गटाचे जयेश बोरसे यांची सोमवारी (ता.२२) बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांची उपस्थिती होती. बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,

शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकत वर्चस्व मिळविले होते. सभापती-उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक घेण्यात आली.

सभापतीपदी राजू भुमरे यांची दुसऱ्यांदा निवड

पैठण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पुन्हा दुसऱ्यांदा पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे बंधू राजू भुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापती ज्येष्ठ संचालक राम एरंडे यांची सोमवारी (ता.२२)निवड करण्यात आली.

पैठण येथे बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरी, बाजार समिती सचीव नितीन विखे यांनी निवडणूक प्रकिया पाडली. सभापतीपदी भुमरे व उपसभापती पदासाठी एरंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

या दोन्ही पदासाठी केवळ दोनच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरी यांनी सभापती व उपसभापती पदांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंद साजरा केला.

वैजापुरात भाजप-शिंदे गटाने मारली बाजी

वैजापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) भाजप युतीचे उमेदवार रामहरी कारभारी जाधव हे सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिवकन्या मधुकर पवार यांची निवड झाली.

या दोघांनी अकरा मते मिळवून प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर जगताप व प्रशांत सदाफळ यांचा चार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश बोरनारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.‌दिनेश परदेशी, अप्पासाहेब पाटील यांच्या पॅनलचे सर्वच अकरा उमेदवार निवडून आले होते.

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी विनय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी युतीकडून जाधव व आघाडीतर्फे जगताप यांनी अर्ज भरले तर उपसभापती पदासाठी युतीकडून पवार व प्रतिस्पर्धी गटाकडून सदाफळ यांनी अर्ज दाखल केले. गुप्त मतदान घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रामहरी जाधव, शिवकन्या पवार यांना विजयी घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT