जालना : जप्त केलेल्या पिस्तुलाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व इतर.  
मराठवाडा

जालन्यात पुन्हा गावठी पिस्तूल 

उमेश वाघमारे

जालना -  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून एकास गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस बुधवारी (ता.11) पकडले आहे. तसेच हे पिस्तूल पुरविणाऱ्या संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एक व्यक्‍ती कारमध्ये गावठी पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह छापा टाकून संशयित मनोज मुकुंद वाकळे (वय 26 रा. कन्हैयानगर, जालना) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेती असताना एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळले. यात पिस्तूल, काडतूस तसेच एक कार असा चार लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विचारपूस केली असता ही पिस्तूल संशयित अजितसिंग मलखासिंग कलानी (वय 27, रा. चंदनझिरा, जालना) याच्याकडून चाळीस हजार रुपयांना विकत घेतल्याची माहिती मनोजने पोलिसांना दिली. त्यानुसार अजितसिंग कलानी याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, विलास चेके, संदीप मांटे यांनी केली. 

नांदेडसह हैदराबाद कनेक्‍शन 
हे पिस्तूल नांदेड येथील एका व्यक्‍तीकडून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. ज्या व्यक्तीकडून अजितसिंग कलानी याने हे पिस्तूल आणले आहे. तो मागील काही दिवसांपासून हैदराबाद येथे राहत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पिस्तूल प्रकरणाचे नांदेडसह हैदराबाद कनेक्‍शन असल्याचे पुढे येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT