Plea to Chief Ministers of Sarpanch of Hingoli Village
Plea to Chief Ministers of Sarpanch of Hingoli Village  
मराठवाडा

'साहेब, हाताला काम अन् पियाला पाणी द्या'; सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे आर्त विनवणी

मंगेश शेवाळकर

हिंगोली : 'साहेब, औंदा पाणी पाण्याची लयं आबाळं हाय, हंडाभर पाण्यासाठी वावरानं फिरावं लागतंय, काहीही करा अन् पाण्याचा प्रश्न सोडवा,' अशी आर्त विनवणी जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (ता. 14) दुरध्वनीवरून केली. 

जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीज या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. यासाठी आज सकाळपासूनच सरपंच व ग्रामसेवक हाती मोबाईल घेऊन बसले होते. त्यानंतर सकाळी जिल्ह्यातील कडती, केसापूर, खेर्डा, खंडाळा, घोटा, चोरजवळा, हिंगणी, हिवराबेल, पिंपळखुटा, लिंगदरी, आजेगाव, बन, भंडारी, ब्रम्हवाडी, दाताडा, धानोरा बंजारा, जांभरून बुद्रुक, कापडसिंगी, केंद्रा बुद्रुक, तोंडापुर, पोतरा, कोंढूर, झुनझुनवाडी या गावातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 

जिल्ह्यात मागील काही वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे, ग्रामीण भागातून टंचाई उपाय योजना नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी भटकंती होऊ लागली आहे. हमी योजनेची कामे नसल्यामुळे हाताला काम नाही, अनेक ठिकाणी गावकऱ्यांची कामाच्या शोधात शहराकडे धाव घेतली आहे. त्यासाठी तातडीने कामे सुरु करणे आवश्यक असल्याचे सरपंचांनी सांगितले. हाताला काम अन् पिण्यासाठी पाणी द्या, अशी आर्त विनवणी सरपंचांनी केली. 

त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्याशी संपर्क साधून पाणी टंचाई उपाय योजनेची कामे हाती घ्यावीत, आवश्यक तेथे तातडीने टँकर सुरु करा, विंधन विहीर व विहीर अधिग्रहण करून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी देण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. या शिवाय मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी हमी योजनेची कामे सुरु करा तसेच कुशल देयक तातडीने अदा करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. त्यामुळे आता प्रशासन कामाला लागले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT