Police action against illegal trading 18 accused arrested 4lakh confiscated
Police action against illegal trading 18 accused arrested 4lakh confiscated sakal
मराठवाडा

बीड : अवैध धंद्यांवर ठिकठिकाणी कारवाया

सकाळ वृत्तसेवा

बीड : शहरासह नेकनूर भागातील जुगार, अवैध दारू धंद्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढाकार घेतला होता.

मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांना माहिती मिळाल्यावरून बीड बसस्थानक जवळ बालाजी ज्यूस सेंटर येथे छापा मारला. येथे ऑनलाइन चक्री जुगार खेळताना अजय अंकुश तावरे (रा. तुळजाईनगर, बालेपीर), सूर्य रमेश तावरे (रा. तुळजाईनगर बालेपीर), अमोल अंकुश आमटे (रा. खांडेपारगाव, ता. बीड), रामेश्वर प्रल्हाद लाटे (रा. ग्रामसेवक कॉलनी, बालेपीर, बीड), प्रभाकर दगडू आंधळे (रा. गुंदा वडगाव, ता. बीड), आनंद शेटे (रा. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नवगण कॉलेज रोडवरील घुमरे कॉम्पलेक्स मधील गाळ्यात छापा टाकून युवराज श्रीमंत सुस्कर (रा. पिंगळे गल्ली, बीड) यास ताब्यात घेतले.

तिसरा छापा कडबा मंडई पेठ बीड भागात मारला. पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन चक्री जुगार खेळताना मोहमंद कैफ मोहमंद अबुबकर (रा. बाबाचौक इस्लामपुरा), शहेबाज अमजद सय्यद (रा. इस्लापुरा, बीड), उजेर मुजाहिद खान (रा. भालदारपुरा बाबा चौक, बीड), शेख फय्याज अब्दुल सलाम (रा. भालदारपुरा बाबा चौक, बीड) यांना ताब्यात घेण्यात आले.

याच भागात चक्री जुगारावर चौथा छापा मारुन अक्षय दीपक राऊत (रा. पिंगळेगल्ली, बीड) यास ताब्यात घेण्यात आले. वरील चार छाप्यांत १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर राजपूत गल्ली, हिरालाल चौक येथे छापा टाकून सावन गिरीधरसिंह परदेशी यास विनापरवाना देशी दारुची विक्री करताना रंगेहाथ पकडून १० हजार ६०० रुपायांची देशी जप्त केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तांदळवाडी घाट येथेही पोलिसांचा छापा

तालुक्यातील तांदळवाडी घाट येथे तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुंदर भानुदास खोसे, बालासाहेब शेषराव काळे दोन्ही (रा. तांदळवाडी, ता. बीड), बाळू सुंदर टेकडे, बाळासाहेब मारुती लहाने, पप्पू विश्वनाथ जगताप (सर्व रा. अंधापुरी ता. बीड), बाळू सखाराम खाकरे (रा. सावरगाव, ता. बीड) मिळून आले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एक लाख ७० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच ठिकाणी अवैध दारू विक्री करण्यासाठी साठा करुन देशी, विदेशी दारू किंमत पाच हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT