Dhannanjay-Munde
Dhannanjay-Munde 
मराठवाडा

दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागले - धनंजय मुंडे

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शहरात किरकोळ भांडणावरून दंगल होण्याची शक्‍यता गुप्तचर विभागाने व्यक्‍त केली होती. तसा प्रस्तावदेखील वरिष्ठांना सादर केला होता. कारवाई करण्याऐवजी ती माहिती दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. या दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागताना दिसले. शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये खासदार, माजी आमदार, नगरसेवक दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंडे यांनी मंगळवारी दुपारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, 'ही हिंदू-मुस्लिम दंगल वाटत नाही. त्याला नंतर तसा रंग देण्यात आला आहे. महापालिकेतील सत्ता पक्षातील एक नगरसेवक हप्ते मिळत नाहीत म्हणून लूट करतो. अतिक्रमण काढायला, नळजोडणी तोडायला लावतो, हे कुणाच्या सांगण्यावरून होते? बहुतांश जळालेली दुकाने ही हिंदूंची आहेत; मात्र त्यांचे भाडेकरू मुस्लिम होते.''
मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुंढे म्हणाले, की राज्यात मोठी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: यायला हवे होते; मात्र ते गृहराज्यमंत्र्यांना पुढे करीत आहेत. यावेळी आमदार सतीश चव्हाण, कमाल फारुकी, कदीर मौलाना, अभिजित देशमुख उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT