crime sakal
मराठवाडा

बोल्डा फाटा येथे पोलिस,चोरट्यांचा पळापळीचा खेळ : तीघे जण ताब्यात

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोल्डाफाटा येथे दोन दुकाने फोडून चोरटे पळुन जाण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोल्डाफाटा येथे दोन दुकाने फोडून चोरटे पळुन जाण्यापूर्वीच पोलिसांनी शुक्रवारी ता. तीन पहाटे घटनास्थळी धाव घेत तीघांना ताब्यात घेतले यावेळी मात्र पोलिस, चोरट्यांचा पळापळीचा खेळ चांगलाच रंगला होता.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत बोल्डाफाटा येथे रॉयल कलेक्शन हे रेडीमेड कपड्याचे दुकान आहे त्याच्या बाजूलाच एक अँटोमोबॉईल्सचे दुकान आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी कपड्याचे दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील साहित्याची नासधूस केली. दुकानातील लॅपटॉप फोडुन टिकला त्यानंतर काही रक्कम व एक होमथेटर व कपडे घेतले. अँटोमोबाईल्सचे दुकान देखील फोडले.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चोरटे हिंगोलीकडे पळाल्याची माहिती मिळाली . त्यावरून पोलिसांनी हिंगोली मार्गावर धाव घेतली.

पोलिस आल्याचे पाहताच चोरट्यांनी पळ काढला पहाटे साडेतीन वाजता चोर अन पोलिसांचा पळापळीचा खेळ रंगला होता.नंतर पोलिसांनी श्रीनिवास गोरे रा. वसमत यास ताब्यात घेतले तर इतर तिघे जण पळून गेले. या घटनेची माहिती बोधनापोड यांनी तातडीने सहाय्यक पोलिस अधिक्षक देशमुख यांना दिली . त्यावरून देशमुख यांनी वाहतुक शाखेला सतर्कतेच्या सुचना दिल्या. वाहतूक शाखेचे जमादार वसंत शिवाजी पारीसकर , फुलाजी सावळे , किरण चव्हाण , शेषराव राठोड यांच्या पथकाने वाहनांची तपासणी सुरुकेली . त्यामध्ये एक दुचाकी विना नंबरची असल्यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दुचाकीवर असलेल्या तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT