31acb_logo_7 
मराठवाडा

लाच स्वीकारताना पोलिस शिपाई रंगेहाथ पकडला, जामीनासाठी अठरा हजारांची केली होती मागणी

रामदास साबळे

केज (जि.बीड) : केज‌ तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यातील लाचखोरीची घटना प्रकार अखेर समोर आली आहे. ठाण्यातील पोलिस शिपायासह अन्य एकास लाच स्वीकारताना बुधवारी (ता.नऊ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्यात पोलिस शिपाई लक्ष्मीकांत काशीराम पवार (वय ५२) व सेवानिवृत्त होमगार्ड शेषेराव वैरागे (वय ५८) अशी नावे आहेत.

या प्रकरणातील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडून जामीन मांडण्यासाठी अठरा हजारांची लाच मागितली होती. त्यातील तडजोडीपोटी ठरलेले नऊ हजार रुपये घेताना  युसूफवडगाव ठाण्याच्या आवारात रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड पथकाने पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT