फोटो 
मराठवाडा

लाचखोर उपायुक्ताला पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला लाचखोर वस्तु व सेवा कर उपायुक्त बाळासाहेब देशमुख याला जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी बुधवारपर्यंत (ता. आठ) एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

तक्रारदार यांचे साखर कारखाना उपभारणीवेळी खरेदी करण्यात आलेल्या मशिनरी व इतर साहित्यावर भरण्यात आलेला वॅट टॅक्स व्याजासह रिफंड मिळविण्याचा प्रस्ताव वस्तु व सेवाकर कार्यालय परभणी येथुन मागवुन घेवुन फाईल पुढे सह आयुक्त यांचे मार्फतीने अतिरीक्त आयुक्त, वस्तु व सेवा कर कार्यालय नागपुर यांचेकडे अंतीम मंजुरीसाठी पाठविण्याकरीता वस्तु व सेवाकर नांदेड येथील उप आयुक्त बाळासाहेब देशमुख हा १० लाखाची लाच घेतांना सोमवारी (ता. सहा) जानेवारी रोजी लाचेच्या जाळ्यत अडकला होता. लाचखोर लोकसेवक बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय ५३ ) उप आयुक्त, वस्तु व सेवा कर कार्यालय, नांदेड मुळ रा. साहेब सदन, सर्वे न. ५७/अ वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद येथील घरांचीही झडती घेण्यात आली आहे. तसेच त्यांचे खारघर मुंबई येथे असलेल्या घराचीही नविन मुंबई येथील एसीबीच्या पथकांनी झडती घेतली असल्याचे सांगण्यात आले. 

सोमवारी रात्री गुन्हा दाखल
त्याला सोमवारी हॉटेल मिडलँड रेल्वे स्टेशन रोड येथे लावण्यात आलेल्या सापळ्यामध्ये अटक करण्यात आले होते. पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन) २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप अधिक्षक विजय डोंगरे, पोलिस गणेश केजकर, गणेश तालकोकुलवार, अंकुश गाडेकर, निळकंठ यमुनवाड यांनी पार पाडली आहे. श्री. डोंगरे यांनी मंगळवारी (ता. सात) बाळासाहेब देशमुख याला न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश के. एन. गौत्तम यांनी अक दिलवसाची पोलिस कोठडी सुनावली.

एसीबीचे नागरिकांना आवाहन 
तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

Latest Marathi News Live Update : आजपासून वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

Pune News: सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; बचावासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी, Video Viral

LPU ची शैक्षणिक क्रांती! २.५ कोटींचे पॅकेज, इंडस्ट्री-बेस्ड डिग्री आणि 'ग्लोबल टेक इमर्शन'सह इंजिनिअरिंग शिक्षणाला दिली नवी दिशा

SCROLL FOR NEXT