file photo 
मराठवाडा

अत्याचार प्रकरणातील ‘त्या’ दोघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शंकरनगर (ता. नायगाव) येथील दोन शिक्षकांनी सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर दोन शिक्षकांनीच पाशवी बलात्कार केला होता. यातील मुख्य आरोपी सय्यद रसुल हा पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी पूर्णा येथून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापक प्रदीप पाटील व प्राचार्य धनंजय शेळके यांंना रविवारी (ता. २६) अटक केली. त्यांना सोमवारी बिलोली जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी सहा दिवस (एक फेब्रुवारी) पोलिस कोठडीत पाठविले आहे.   

शंकरनगर (ता. नायगाव) येथील श्री साईबाबा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका सहावीतील मुलीला सांस्कृतीक कार्यक्रमाचे फोटो दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेऊन तिच्यावर दोन नराधम शिक्षकांनी पाशवी बलात्कार केला. या घटनेतील नराधम शिक्षक सय्यद रसुल आणि दयानंद राजूळे यांच्यासह मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके आणि एका महिलेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. जिल्हाभर या घटनेचे पडसाद उमटत असतांना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्वत : आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, बालाजी हिंगनकर, श्री. केंद्रे, बाबर आणि श्रीरामे यांना सोबत घेऊन गुप्त माहितीवरून बोंढार (ता. नांदेड) शिवारातून सय्यद रसुल याला अटक केली.

प्रदीप पाटील व धनंजय शेळके पोलिस कोठडीत

तो पोलिस कोठडीत असतांनाच निलंबीत मुख्याध्यापक प्रदीप पाटील व प्राचार्य धनंजय शेळके या दोघांना पोलिसांनी पूर्णा येथून रविवारी (ता. २६) दुपारी अटक केली. चोख पोलिस बंदोबस्तात या दोघांना बिलोली जिल्हा न्यायालयात हजर केले. यांना पाहण्यासाठी न्यायालयात अनेकांनी गर्दी केली होती. त्यांना न्यायालयाने सहा दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी अहमदपूर (जिल्हा लातूर) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अश्‍विनी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. 

यातील एकजण अजून फरारच

एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा सय्यद रसुल व त्याच्या साथीदाराला वाचविण्याचा प्रयत्न करणारे मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके यांना अटक केली. मात्र यातील दयानंद राजूळे हा अत्याचार करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत आला नाही. त्याला लवकरच अटक करु असा विश्‍वास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी व्यक्त केला.  
  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : वातावरण खराब असल्यामुळे...! मोदींनी सांगितलं मणिपूरला उशीरा पोहचण्याचे कारण...

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Movie Review : दशावतार - प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्यागाची उत्तम गुंफण

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

SCROLL FOR NEXT