Nanded News 
मराठवाडा

Video : पोलिस विभागाने केले सफाई कामगारांचे कौतुक

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी व कामगारांचे शुक्रवारी (ता. तीन) पोलिस विभागाच्या वतीने कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर त्यांना अल्पोपहार तसेच सॅनीटायझर, मास्क आणि हॅण्डग्लोजही देण्यात आले. 

नांदेड महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने तसेच आर अॅण्ड बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या स्वच्छता आणि साफसफाई महत्वाची आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता आणि साफसफाईचे नियोजन केले आहे. त्यामुळे या सफाई कर्मचारी व कामगारांचा पोलिस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलिस उपाअधिक्षक अभिजित फिसके, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, महापालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार, स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
गेल्या ता. २२ मार्चपासून स्वच्छता आणि साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे आभार मानण्यासाठी तसेच कौतुक करण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शुक्रवारी (ता. तीन) वजिराबादला मुथा चौक येथे सकाळी कार्यक्रम घेतला. यावेळी सफाई कर्मचारी आणि कामगारांचा सत्कार करुन कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांना मास्क, हॅण्डग्लोज, सॅनीटायझर देण्यात आले. 

पोलिस अधिक्षकांनी केले कौतुक
जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सफाई कर्मचारी आणि कामगारांचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता आणि साफसफाई महत्वाची असून त्या दृष्टीने नांदेड शहरात स्वच्छतेची महत्वाची जबाबदारी हे कर्मचारी पार पाडत आहेत. स्वच्छतादूतांचे सध्याच्या परिस्थितीत स्वच्छतेचे काम महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती आदरभाव राखत आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी देखील रात्रदिवस काम करत आहेत. त्यांनी देखील आपतकालीन व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांचे स्वागत करावे आणि त्यांच्याशी सौजन्याने वागून त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. मगर यांनी व्यक्त केली.   

सफाई कामगारही भारावले
पोलिस विभागाने केलेल्या सत्कारामुळे आणि दिलेल्या भेटवस्तूमुळे सफाई कर्मचारी आणि कामगारही भारावून गेले. त्यातील काही जणांनी आपल्या भावनाही यावेळी व्यक्त केल्या. आमचे काम महत्वाचे असले तरी दुर्लक्षित आहे. तरी देखील आमच्या कार्याची दखल पोलिस विभागाने घेतली त्याबद्दल मनापासून आभार. आमची काळजी घेतल्याबद्दल तसेच आमच्याबद्दल दाखविलेल्या आपुलकीमुळे आम्हाला देखील काम करताना आणखी बळ मिळणार असल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT