फोटो
फोटो 
मराठवाडा

पोलिसांचे ‘हात’ होणार नाहीत काळे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गुन्हेगाराच्या हाताचे ठसे हे पुर्वीपासून घेण्यात येतात. त्यासाठी काळी शाई वापरण्यात येते. हे ठसे घेण्यासाठी तपासीक अमलदाराचे हातसुध्दा काळे होत. परंतु आता माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व संदर्भ बदलत चालले आहेत. आता आरोपींचे ठसे घेण्यासाठी पोलिसांना स्कॅनींग मशिन उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आरोपीसोबत पोलिसाचे हात काळे होणार नाहीत. आधुनिकतेमुळे शुन्य मिनटात ‘वन क्लिक वन रेकॉर्ड’ उपलब्ध होणार आहे. 

पुर्वीपासून गुन्हा घडला की, त्यातील गुन्हेगारांच्या नोंदीसह आदी तपशिल ठेवण्यासाठी हाताचे ठसे व कागदावर नोंदी केल्या जात होत्या. कित्येक वेळा आरोपींच्या ठस्यावरून गुन्हेगारांचा शोध लागत असे. सध्या एका पानाला काळी शाई फासून त्यावर आरोपीच्या हाताचे ठसे घेण्यात येतात. तसेच आरोपीचा चेहरा, उंची, जन्मखूण यांच्या नोंदीही घेतल्या जात होत्या. या नोंदीचे रेकॉर्ड तीन वर्ष ठाण्यात सांभाळल्या जात होते. काही काळानंतर सदरचे रेकॉर्डचे कागद खराब होत असत. त्यामुळे या रेकॉर्डची जपणुक करण्यास अडचणी येत असत. 

संगणकच रेकॉर्डरुमचे काम 

बदलत्या काळात आता या सर्व बाबी नोंदविण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसीत झाली. त्यानुसार संगणकच रेकॉर्डरुमचे काम करीत आहे. ही कार्यप्रणाली राज्यभर सुरू असून आता नांदेडमध्येही या प्रणालीद्वारे काम होणार आहे. गुन्हा केलेल्या आरोपीच्या हाताचे ठसे घेताच त्याची कुंडली उघणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वपोलिस ठाण्यात ही कार्यप्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही कार्यप्रणाली मुंबई शहरात सुरू झाली आहे. गुन्हेगारांच्या माहितीची देवाण- घेवाण करण्यासाठी आता वेगवेगळे सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशातील ही माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. 

फिंगर प्रींट हे पुण्याला पाठविण्यात येत होते

पूर्वी आरोपीचे घेतलेले फिंगर प्रींट हे पुण्याला पाठविण्यात येत होते. तपासणीतून त्याची राज्यातील गुन्हेगारीची माहिती उपलब्ध होत असे. समजा एखादा गुन्हेगार बाहेर राज्यात गुन्हा करीत असल्यास त्याची माहिती या क्लीकवर लगेच समजणार आहे. या नविन तंत्रप्रणालीमुळे बदलत्या गुन्हेगारीवर वचक बसणार असल्याचे सांगण्यात आले. याचा नक्की पोलिस दलाला फायदा होणार असल्याचे बोलल्या जाते. 

जिल्ह्यात ३७ डीजीटल स्कॅनर

जिल्ह्यातील ३६ पोलिस ठाणे आणि एक सायबर पोलिस ठाणे अशा ३७ ठाण्यांना हे स्कॅनर देण्यात आले आहे. तसेच ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सिस्टीममध्ये आय स्कॅनर, फिंगर प्रींट स्कॅनर, कॅमेरा (चेहऱ्याच्या नोंदीसाठी), मॉनीटर या साहित्याचा समावेश आहे. या स्कॅनरमध्ये नोंद झालेल्या गुन्हेगारांची सर्व माहिती महाराष्ट्रात पोलिसांना मिळणार आहे.

एकदा उघडून पहाच-- नांदेडमधील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली
 
एफआयआरचे होणार भाषांतर

या डीजीटल तंत्रज्ञानाला काही दिवसांपासून सुरू झालेल्या सीसी १० या सॉफ्टवेअरद्वारे एफआयआर व आरोपीच्या अटकेबाबत व इतर माहिती भरली जात आहे. या एफआयआरमधील देशात कुठेही विविध १८ भाषेत भाषांतर करण्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

SCROLL FOR NEXT