मराठवाडा

पाथरी कत्तलखान्यावर पोलिसांची धाड ; 40 जनावरे, 500 किलो गोमांस जप्त

धनजंय देशपांडे

पाथरी : शहरातील लेंडी नाल्यावरील कत्तलखान्यात मोठया प्रमाणात गोवंशाची कत्तल करण्यासाठी जनावरे आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 40 जिवंत जनावरे आणि 5 क्विंटल गोवंश मास आढळून आले. ही घटना गुरुवारी (ता.२०) रोजी दुपारी ५ च्या सुमारास घडली.

पाथरी शहरातील लेंडी नाल्यावरील कत्तल खाण्यात बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यासाठी जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. बोधगिरे, फौजदार आवेज मकसूद काजी यांनी आपल्या पथकासह कत्तल खाण्यावर दुपारी ५ च्या सुमारास छापा टाकला. यावेळी त्यांना ४० जिवंत जनावरे, व ५ क्विंटल गोवंशाचे मास आढळून आले. तेथे असलेल्या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

तसेच विशेष म्हणजे तेथील एकाही जनावरांचा दाखला त्यांच्याकडे आढळून न आल्याने ही जनावरे कत्तल करण्यासाठीच आणल्याचे सिद्ध झाले. त्यामुऴे पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्यानुसार शेख सुभान शेख सुलतान (रा.आझाद नगर, पाथरी),  मुखींद वहाब कुरेशी (रा. मुर्तुजा कॉलनी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Latest Marathi News Live Update: व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT