Crime News Crime News
मराठवाडा

Hingoli | हिंगोलीत पोलिसांची मोठी कारवाई, जिलेटीन अन् डिटोनेटर जप्त

हिंगोलीत पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सिरला तांडा येथे हट्टा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जिलेटीनच्या ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर सापडले असुन एका आखाड्यावरुन सोमवारी (ता.२८) सायंकाळी हे जिलेटिन व डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातील सिरला तांडा शिवारामध्ये एका शेतात स्फोटक पदार्थ असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक एस. एस. तावडे, जमादार भुजंग कोकरे, जीवन गवारी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एकनाथ राठोड यांच्या सिरला तांडा शिवारातील आखाड्यावर छापा टाकला. (Police Seized Jelatin Sticks, Detonator In Hingoli)

यावेळी आखाड्याची तपासणी केली असता एका कोपऱ्यामध्ये जिलेटिनच्या काड्याचा बॉक्स व डिटोनेटरचा बॉक्स लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स काढून पाहणी केली असता त्यामध्ये ३२१ जिलेटिनच्या कांड्या व ५०० डिटोनेटर आढळून आले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स जप्त करून एकनाथ राठोड याच्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विहिरीच्या खोदकामासाठी जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर आणण्यात आले होते.

मात्र शिल्लक राहिलेल्या कांड्या व डिटोनेटर योग्य पद्धतीने हाताळणी करून त्याचा साठा करणे आवश्यक होते. शिल्लक राहिलेल्या कांड्या शेतातील आखाड्यावर निष्काळजीपणाने ठेवण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे अधिक तपास करत आहेत.(Hingoli)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT