police sketch artist  
मराठवाडा

संशयितांच्या रेखाचित्राबाबत पोलिसांची अडचण 

उमेश वाघमारे

जालना - हल्लीच्या टेक्‍नॉलॉजीच्या काळात गुन्हेगार गुन्हा करताना अनेकवेळा स्वतःची ओळख टिपली जाणार नाही, असे गुन्हे करतात. त्यामुळे अनेकवेळा पोलिसांना तपासात पुढे सरकण्यासाठी धागेदोरे मिळत नाहीत. अशावेळी पोलिस अनेकवेळा फिर्यादी किंवा साक्षीदाराच्या सांगण्यावरून संशयित आरोपींचे रेखाचित्र काढून तपास पुढे सरकवितात; मात्र जिल्हा पोलिस प्रशासनाकडे रेखाचित्रकारच नाही. त्यामुळे खासगी रेखाचित्रकाराच्या मदतीने पोलिसांना रेखाचित्र काढण्याची वेळ येत आहे. 

एखादा दरोडा, लुटमारी, खून, खुनाचा प्रयत्न अशा घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनावर त्या गुन्ह्याचा लवकर उलगडा करण्याचा दबाव असतो. त्यामुळे पोलिसांना गुन्हा घडल्यानंतर तपास पुढे सरकविण्यासाठी एखादी लीड मिळणे अपेक्षित असते. त्यामुळे पोलिसांकडून अनेकवेळा गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासून ठराविक सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून त्यातून काही सुराग मिळतो का? याची चाचपणी करतात; मात्र एखाद्या गुन्ह्यात धागेदोरे  मिळण्यास विलंब होत असेल तर फिर्यादी किंवा साक्षीदार यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी केली जाते; तसेच या चौकशीदरम्यान फिर्यादी किंवा साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिस संशयित आरोपींचे रेखाचित्र तयार करतात. त्यासाठी उत्तम तंत्रशुद्ध रेखाटन चित्रकाराची गरज असते.

खासगी किंवा औरंगाबाद येथून रेखाचित्रकार
रेखाचित्रकाराला फिर्यादी किंवा साक्षीदार यांनी सांगितलेल्या वर्णनावरून पोलिस रेखाचित्र जारी करून त्या दिशेने तपास करतात; मात्र जिल्हा पोलिस प्रशासनामध्ये रेखाचित्रकार नाही. त्यामुळे खासगी किंवा औरंगाबाद येथून रेखाचित्रकार आणून पोलिसांकडून एखाद्या गुन्ह्यातील संशयितांचे रेखाचित्र काढले जाते. त्यामुळे पोलिस प्रशासनात टेक्‍नॉलॉजीच्या काळातही रेखाचित्रकार असणे गरजेचा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. 

चित्रकारामुळे पोलिसांना मदत 
मे महिन्यात जालना-राजूर रोडवर सराफा व्यापाऱ्याला गावठी पिस्तुलाचा धाक दाखवीत लुटले होते. या प्रकरणातील चार संशयित आरोपींचे चंदनझिरा पोलिसांनी खासगी रेखाचित्रकाराकडून रेखाचित्र जारी केले होते. त्याच्या आधारे नंतर पोलिसांनी संशयितांना पकडले होते. अशाप्रकारच्या अनेक प्रकरणात रेखाचित्रकाराची पोलिसांना मदत होते. 
 

संगणकावर काढता येतात रेखाचित्र 
एखाद्या घटनेतील फिर्यादी किंवा साक्षीरादाच्या वर्णनावरून संगणकावर ही रेखाचित्र काढता येतात; मात्र त्यासाठी तंत्रशुद्ध संगणकचालक अपेक्षित आहे. तोही जालना पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. 

पोलिस खात्यातील एखादा कर्मचारी किंवा अधिकारी उत्तम रेखाचित्रकार असेल तर त्यांच्याकडून रेखाचित्र काढले जातात; परंतु रेखाचित्रकार पोलिस प्रशासनात उपलब्ध नाही. एखाद्या घटनेत खासगी किंवा औरंगाबाद येथून रेखाचित्रकाराची मदत घेऊन रेखाचित्र काढले जातात. 
- चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 

रेकॉर्डवरील अनेक आरोपींची छायाचित्रे संकलित केलेली आहेत. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर फिर्यादी किंवा साक्षीदारास रेकॉर्डवरील आरोपींचे छायाचित्र दाखविले जातात. त्यानुसार पुढील तपास केला जातो. 
- राजेंद्रसिंह गौर,  पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT