rain 
मराठवाडा

मराठवाड्यात येत्या बुधवारी पुन्हा हलक्या पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः यंदा उन्हाळा सुरू होऊनही अद्याप पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. दोन दिवसांपुर्वी मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा ता.२५ रोजी मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने वर्तवली आहे. त्यामुळे यंदा अर्ध्या उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिण्यात सलग २२ दिवस अतिवृष्टी
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे. गत वर्षातील पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिण्यात सलग २२ दिवस अतिवृष्टी झाली. त्यानंतर जानेवारी महिण्यात देखील ढगाळ वातावरण राहुन पावसाने हजेरी लावली. अख्खा हिवाळा ढगाळ वातावरणात संपला. आता मागील महिनाभरापासून उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे, मात्र सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच अधुन-मधुन पाऊस देखील पडत आहे.

वाऱ्यामुळे फळबागा मोडुन पडल्या
सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आता ही पिके काढणीला आली असता मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडु लागला आहे. तसेच काही भागात गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबतच वाऱ्यामुळे फळबागा मोडुन पडल्या आहेत. हा पाऊस थांबताच आता पुन्हा पावसाचा इशारा आला आहे. त्यामुळे शेतकरी, फळबागायतदार धास्तावले आहेत. 

तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता
मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्‍वच्‍छ ते अंशत: ढगाळ राहुन ता.२५ मार्च रोजी हिंगोली, लातुर, नांदेड, उस्‍मानाबाद व परभणी जिल्‍ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली आहे.

याकडे द्या लक्ष...
हरभरा, ज्वारी, गहु पिकाची वाळल्‍यानंतर काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ऑक्‍टोबरमध्‍ये लागवड केलेल्‍या ऊस पिकास वरखताची चौथी मात्रा ४० टक्के नत्र, ५० टक्के स्‍फुरद व ५० टक्के पालाश देऊन पाणी दयावे. ऊस पिकावरील पांढरी माशीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. संत्रावरील फुलपाखराची अळी दिसुन आल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिलीप्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे काही ठिकाणी बागेमध्‍ये झाडांच्‍या फांदया मोडल्‍या असल्‍यास त्‍या सिकेटरच्‍या साहयाने कापून टाकाव्‍यात. त्‍यानंतर त्‍वरीतत्‍यावर कार्बेन्‍डाझिम १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT