File Photo 
मराठवाडा

परीक्षेच्या पोस्टमुळे विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था, कुठे ते वाचा 

शिवचरण वावळे

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्याच पाहिजे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रा. हनुमंत भोपळे यांची विद्यापीठाच्या परीक्षा रद्द झाल्या पाहिजे, अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन बिघडेल व याचा परिणाम पुढील चार ते पाच वर्ष होईल, अशा आशयाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

प्रा. भोपाळे यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होतीलच असे नव्हे. तेव्हा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत नोटीस आल्याशिवाय कोणत्याही बातम्यांमुळे गोंधळून जाऊ नये, असे स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्राचे विद्यार्थी नेते तुषार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

सोशल मीडियाची पोस्ट वयक्तीक
सध्या विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या संपर्कापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा होणारच नाहीत अशा संभ्रमावस्थेत राहु नये, अशा आशयाच्या प्रा. डॉ. हनुमंत भोपळे यांच्या व्हायरल झालेल्या पोस्टमधून त्यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली ती अत्यंत योग्य आहे. पण विद्यापीठ जोपर्यंत अधिकृत नोटिस काढणार नाहीत. यामुळे कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेऊन गाफील राहु नये व विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालु ठेवा. परीक्षा होतील अथवा नाही पण तुम्ही अभ्यास बंद करता कामा नये, असे आवाहन देखील विद्यार्थी नेते तुषार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

विद्यार्थ्यंच्या हिताकडे असेल लक्ष
सध्या देशभराच लॉकडाऊन सुरु आहे. ही परिस्थिती पूर्ववत होताच आम्ही विद्यापीठ स्तरावर वरिष्ठांना निवेदन देऊन मुंबई विद्यापीठाने सर्व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही त्याच धर्तीवर निर्णय घ्यावा अथवा महाविद्यालय स्तरावर परीक्षा घ्याव्यात व संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गुणांकन करुन पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन लक्षात घेता लवकर निकाल लावण्यात यावा अशी मागणी राहुल बोकारे, अशिष देशमुख, भोसीकर, नागोराव चव्हाण, गणेश तरडे, साई गिरी, संदीप कांबळे, यादव तुडमे,,शादुल होनवडजकर, बंडु पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची अपडेट! राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार? पंचगंगा पुलावर दुहेरी वाहतुकीची चाचणी, पर्यायी मार्ग कोणते?

मोहम्मद सिराजला मिळाला ICC चा मोठा पुरस्कार; म्हणाला, 'हा सन्मान फक्त माझा नाही, तर...'

"माझ्या आयुष्यात ती आली" महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेने दिली आनंदाची बातमी, PHOTO VIRAL !

Kolhapur Crime: 'महेश राख खूनप्रकरणी चौघांना अटक'; आणखीन काही नावे निष्पन्न, न्यायालयात हजर करणार

Latest Marathi News Updates : ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणामुळे खळबळ; पूजा खेडकरच्या घरी पोलिस दाखल

SCROLL FOR NEXT