file photo
file photo 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत पोटनिवडणूका

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली नगरपरिषद, नगरपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमाची अनुसूची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रसिद्ध केली आहे.  

या अनुसूचीत नायगाव प्रभाग क्र. एक जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नायगाव तहसिलदार सुरेखा नांदे, नायगाव नगरपंचायत मुख्‍याधिकारी गंगाधर ईरलोड हे आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण नगरपंचायत कार्यालय नायगाव. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण नगरपंचायत कार्यालय नायगाव असून मतमोजणीचे ठिकाण- नायगाव नगरपंचायत सभागृह हे राहील.  

धर्माबाद प्रभाग क्र. दोन-अ, चार-अ एकुण दोन
धर्माबाद प्रभाग क्र. दोन-अ, चार-अ एकुण दोन जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्माबादचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धर्माबाद तहसिलदार दत्तात्रय शिंदे, धर्माबाद नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी मंगेश देवरे हे आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण नगरपरिषद सभागृह प्रशासकीय इमारत नगरपरिषद धर्माबाद. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण- नगरपरिषद सभागृह प्रशासकीय इमारत नगरपरिषद धर्माबाद असून मतमोजणीचे ठिकाण- नगरपरिषद सभागृह प्रशासकीय इमारत नगरपरिषद धर्माबाद हे राहील.

हिमायतनगर प्रभाग क्र. १३ 
हिमायतनगर प्रभाग क्र. १३ जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हदगाव उपविभागीय अधिकारी महेश वडदकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हिमायतनगर तहसिलदार नरसिंग जाधव, हिमायतनगर नगरपंचायत मुख्‍याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे या आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण तहसिल कार्यालय हिमायतनगर. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण तहसिल कार्यालय हिमायतनगर. मतमोजणीचे ठिकाण- तहसिल कार्यालय हिमायतनगर हे राहील.

बिलोली प्रभाग क्र. पाच-अ 
बिलोली प्रभाग क्र. पाच-अ जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शरद झडके तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बिलोली तहसिलदार विक्रम राजपूत, बिलोली नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी त्र्यंबक कांबळे हे आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण- मुख्याधिकारी यांचे दालन नगरपरिषद बिलोली. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण- मुख्याधिकारी यांचे दालन नगरपरिषद बिलोली असून मतमोजणीचे ठिकाण- नगरपरिषद बिलोली हे राहील, असे नमूद केले आहे.

नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली नगरपरिषद / नगरपंचायत
जिल्ह्यातील नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली नगरपरिषद / नगरपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र देण्‍याची व घेण्‍याची सुरुवात सोमवार (ता. १३) जानेवारी सकाळी ११ वाजल्‍यापासून सुरु झाली आहे. नामनिर्देशनपत्र भरण्‍यासाठी अंतिम दिनांक व वेळ शुक्रवार (ता. १७) जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी तिनपर्यंत). नामनिर्देशनपत्र अर्जाची छाननी करण्‍याचा वेळ व दिनांक- शनिवार (ता. १८) जानेवारी सकाळी ११ वाजल्‍यापासून राहील. वैध नामनिर्देशित उमेदवाराची यादी प्रकाशित करण्‍याचा शनिवार (ता. १८) जानेवारी आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍यासाठीचा अंतिम दिनांक- अपिल नसेल तेथे गुरुवार (ता. २३) जानेवारीपर्यंत दुपारी तिनवाजेपर्यंत. अपिल असेल तेथे अपिलाचा निर्णय ज्‍या तारखेस करण्‍यात येईल त्‍या तारखेनंतर तिस-या दिवशी किवा तत्‍पूर्वी मात्र सोमवार (ता. २७) जानेवारीपर्यत. निवडणूक लढविणा-या उमेदवाराची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा व चिन्‍ह नेमून देण्‍याचा दिनांक- उमेदवारी मागे घेण्‍यासाठीच्‍या शेवटच्‍या दिवसानंतरच्‍या लगतच्‍या दिवशी. मतदान ज्‍या दिवशी घेण्‍यात येईल तो दिनांक व त्‍याचा कालावधी- गुरुवार (सहा) फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातपासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत. मतमोजणीचा दिनांक व वेळ- शुक्रवार (ता. सात) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्‍यापासून राहील.

अपिलिय अधिका-याकडे अपिल करावयाचे 
नामनिर्देशनपत्र स्विकारणे अथवा नाकारणे याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याच्‍या कोणत्‍याही निर्णयाविरोधात जर अपिलिय अधिका-याकडे अपिल करावयाचे असेल तर त्‍यासाठीचा अंतिम दिनांकाकरिता महाराष्‍ट्र नगरपरिषदा नगरपंचायती निवडणूक नियम १९६६ चे नियम १५ पहा, असेही अनुसूचीमध्ये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT