मराठवाडा

लातूरसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर

हरी तुगावकर

लातूर- लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांच्या नावाची घोषणा आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी (ता. 04) आयोजित सत्ता संपादन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष भिंगे उपस्थित होते. या वेळी माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील, एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन, शिवानंद हैबतपूरे, संयोजक संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.

लातूर लोकसभा मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे. या मतदारसंघासाठी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर हे आघाडीचे उमेदवार असतील. गारकर यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांच्यापाठीशी सर्वांनी उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विचारले नाही. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन जाहिर सभा सुरु केल्या आहेत. वंचिताचा उत्साह, वंचिताचे हे बंड पाहून आता विचारयला येत आहेत. त्यांना आमच्यासोबत आघाडी करायची नाही तर वंचिताचे बंड मोडून काढायचे आहे. हे बंड मोडले तर पुन्हा उभा रहायला वेळ लागेल असे त्यांना वाटत आहे. आमचे हे बंड बदल घडवल्याशिवाय थांबणार नाही. राज्यात 48 मतदारसंघात आघाडीचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. या उमेदवारात एकही प्रस्तापित उमेदवार नसेल. सर्व उमेदवार सामान्य असतील असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्र व राज्यातील सरकारवरही त्यांनी कडाडून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवून आणल्या जावू शकतात अशी भिती व्यक्त करीत त्यांनी (ता. 21) फेब्रुवारीपर्यंत आघाडीच्या वतीने सर्वत्र शांती मार्च काढण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

आमची सत्ता आल्यानंतर शिक्षणासाठी दहा टक्के खर्च केला जाईल. केंद्र शासनाने नुकताच जाहिर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी खोटी आहे. या गैरविश्वासू सरकारला खाली खेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले. या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT