Prakash Ambedkar 
मराठवाडा

Prakash Ambedkar: "मोदींना आत्ताच हिमालयात पाठवा"; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Sandip Kapde

Prakash Ambedkar:  वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसला टोला लगावला आहे. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेसने राहुल गांधी यांना निर्णय घेणे शिकवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.बीड येथील सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "आरएसएसवाल्यांचा नवीन प्रचार सुरु आहे. नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळणार. दोन वर्ष पंतप्रधान राहणार अणि त्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार सुरु आहे. तुम्ही आत्ताच त्यांना हिमालयात पाठवा. देशाचं खूप मोठं भलं होईल."

"उद्याचा लढा हा मानसन्मान की एक किलोच्या मटणासाठी, निवडणुकीतली दारू पैशांसाठी इमान गहाण ठेवायचा की नाही हे जनतेला ठरवायचं आहे. जर जिंकायचं असेल, तर जो कार्यकर्ता स्वत:ला फुले शाहू-आंबेडकर विचारांचा म्हणवतो. त्याने मनाशी खूणगाठ बांधा. जिंकायचं असेल, तर डोक्यात आराखडा पाहिजे. आरक्षण उपभोगणारा समाज माझ्या लढ्यातील सोबती आहे. मी त्याचा विचार आणि संस्कृतीसोबत स्वीकारेल. तेव्हाच आपण विजयी होऊ", असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

तसेच मुस्लिम जसे म्हणतात की त्यांचा धर्म धोक्यात आहे. हिंदु धर्म इथे धोक्यात नाही. धोक्यात आरक्षणवादी धोक्यात आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ईडीच्या चौकश्यासमोर काँग्रेसमधून कोण कोण गेलं? त्यांना मोदींनी असं म्हटलं की एप्रिलपर्यंत माझ राज्य आहे, तोपर्यंत मी पंतप्रधान आहे. मी सांगतो तसं वागायचं. जर तसं वागायचं नसेल तर तिहार जेलचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे मोदी जो मार्ग सांगतील तो मार्ग हो लोक स्विकारत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "काँग्रेसवाले राहुल गांधी यांचे गुणगान गातात, चांगली गोष्ट आहे. पण काँग्रेसवाल्यांना सांगतो की, राहुल गांधींना निर्णय घेणाचं शिकवा. एका बाजूला राहुल गांधी अदानी विरोधात आंदोलन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी ज्यांच्याशी राजकीय मैत्री केली ते शरद पवार म्हणतात अदानी शिवाय दुसरा चांगला माणूस नाही. त्यांच्यासोबत उद्घाटनाला जाऊन राहुल गांधींच्या छाताडावर नाचायला सुरुवात करतात."

ज्यांना निर्णय घेता येत नाहीत. तो देशाचं काय नेतृत्व करेल? राहुल गांधींच्या काँग्रेसवाल्यांनी आमच्या नादाला लागू नये. नाहीतर अजून तुमच भिंग बाहेर काढू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT