eid. 
मराठवाडा

घरोघरी नमाज अदा; ‘कोरोना’मुक्‍तीसाठी दुआ...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः यावर्षी पवित्र रमजान महिण्यात कोरोनाचे संकट आल्याने सार्वजनिक कार्यक्रम करता आले नाहीत. रमजान महिण्याचा शेवट ईद सणाने केला जातो. मात्र, यावर्षी पहिल्यादाच सार्वजनिक ठिकाणी एकत्रित अदा होणारी नमाज सोमवारी (ता.२५) घरोघरी साध्या पध्दतीने साजरी करून इतर कोणालाही न बोलावता घरीच शिरखुर्म्याचा आस्‍वाद घेतला व कोरोनामुक्‍तीसाठी दुआ केली. 


पवित्र रमजान महिण्यात हिंगोली शहरातील औंढा रोड, रिसाला नाका यासह जवळपास सर्वच मस्‍जिदमध्ये ईदची नमाज अदा केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउन, जमावबंदीचे आदेश असल्याने ईदची इदगाह मैदानावर होणारी एकत्रित नमाज रद्द करून ती घरीच अदा करण्यात आली. शहरात सर्वांनी याचे पालन करून ईद साजरी केली. ईदच्या दिवशी रस्‍त्‍यावर दिसणारी गर्दी देखील आज ओसरली होती. तसेच शिरखुर्मा तयार करून तो नातेवाईकांसह मित्रमंडळींना घरी बोलावून तो दिला जातो. यावर्षी मात्र कोणालाही आमंत्रित न करता शिरखुर्मा तयार करून त्‍याचा घरीच आस्‍वाद घेण्यात आला. 

वस्‍तू खरेदीसाठी गर्दी नाही 
दरवर्षी ईदसणानिमित एक ते दोन दिवस अगोदर बाजारात विविध वस्‍तू खरेदीसाठी होणारी गर्दी यावर्षी मात्र पहावयास मिळाली नाही. परिणामी, रस्‍त्‍यावर शुकशुकाट होता. ईदसाठी नवीन कपडे, खरेदी करण्याची परंपरा आहे, मात्र यावर्षी प्रथमच ईदला कपडे खरेदी करण्यात आले नाहीत. 

एकमेकांना व्हॉटसअपवर तसेच फोन करून शुभेच्छा
कोरोनाच्या संकटामुळे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत ईदचा सण साजरा करण्यात आला. हिंगोलीसह जिल्‍ह्यात वसमत, कळमुनरी, सेनगाव, औंढा नागनाथ शहरासह तालुक्‍यातील अनेक गावातदेखील घरोघरी रमजान ईद साजरी करण्यात आली. तसेच शिरखुर्म्याचा देखील आस्‍वाद घेण्यात आला. घरुनच एकमेकांना व्हॉटसअपवर तसेच फोन करून देखील ईदच्या शुभेच्‍छा देण्यात आल्या. पहिल्यांदाच रमजान ईदचा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT