file photo
file photo 
मराठवाडा

परभणीत ऊरुस यात्रेची तयारी वेगाने

सकाळ वृत्तसेवा

परभणी : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिध्द असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या ऊरुसाला शुक्रवार (ता.३१) पासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरूसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहाट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे.
परभणी शहरातील ऊरुस यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. सर्वधर्मातील लोक हा ऊरुस हर्षोलासात साजरा करत असता. यावर्षी ता. ३१ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान, ऊरुस यात्रा भरणार आहे. ता. २ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर केली जाते. प्रशासनाच्यावतीने मानाचा संदलकडून यात्रेला सुरवात करुन दिल्या जाते. जिल्हा प्रशासनासह पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग,  महापालिका यांच्यावतीने देखील संदल काढून हजरत सय्यद शहा तुराबुल हक साहेबांना गलफ सोडवला जातो.

मनोरंजनाचे साहित्य दाखल
 जाम रस्त्यावरील दर्गा मैदानात मीना बाजार आणि उंच रहाट पाळणे व मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहेत. उरूसासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी परभणी शहरात दाखल होत असतात. एकंदर उरुसाची शहरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या उरूस यात्रेसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाची व खेळ साहित्यांची बांधणी सुरू केली आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी यात्रेच्या स्थळाची पाहणी केली.

दर्ग्याला रंगरंगोटी 
महापालिकेच्यावतीने ठिकाणी पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छता स्वच्छतेची व्यवस्था केली जातआहे. पोलिस व महापालिकेचे कार्यालयदेखील यात्रेचे उघडण्यात आले आहे. महत्त्वाच्या असणाऱ्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक यांच्या दर्ग्याला रंगरंगोटी केली जात आहे. याठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा - एनआरसी’च्या विरोधात  परभणीत कडकडीत बंद ​

मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद

 परभणीत हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहब दर्गा येथे उर्स ता.३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत भरणार आहे. उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडू नये, याकरीता ता.दोन फेब्रुवारी रोजी मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन परभणी शहरातील महापालिका हद्दीतील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या (सीएल-३) देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-२ सीएल, एफएल, टिओडी-३, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-३ परवाना कक्ष व एफएल, बीआर-२, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री करण्यास बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकाविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT