pritam munde esakal
मराठवाडा

'प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदाराकडून पैसे घेतले आहेत का ?'

कंत्राटदारांची नार्को टेस्ट करा आणि त्यांना विचारा...

सकाळ डिजिटल टीम

बीड : बीडमध्ये सध्या घर एक जण बांधत आहे. त्या घराची वास्तूशांती दुसराच कोणी करत आहे. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी करुन नये, असा टोला भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. गेवराई तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे प्रारंभ आज रविवारी (ता.१७) मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील विकास कामांवरुन मुंडे बहिणी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. (Pritam Munde Attack On Nationalist Congress Party Over Development Works In Beed)

प्रीतम मुंडे (Pritam Munde) म्हणाल्या, पंकजा मुंडे पालकमंत्री असताना या सर्व कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे कोणी कितीही नारळ फोडू द्या, जनता हुशार आहे. या प्रसंगी मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दबाव आहे का, असा सवाल केला. जिल्ह्यातील कंत्राटदारांची नार्को टेस्ट करा. त्यांना विचारा, की मागील आठ वर्षांमध्ये प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदाराकडून कामाच्या मोबदल्यात काही पैसे घेतले आहेत का?

मी कोणाचा चहा देखील घेतला नाही. प्रामाणिकपणाने तुमचं काम करण्याच प्रयत्न करत असल्याचे सांगून प्रीतम मुंडे म्हणाल्या, की जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT