Beed News 
मराठवाडा

ट्विटद्वारे तरुणाने मलेशियात मदत मागितली आणि खासदार मुंडेंनीही तत्परता दाखवली

दत्ता देशमुख

बीड : ‘मी मलेशियामध्ये आहे, माझा भाऊ भारतातून मला भेटण्यासाठी आला आहे. त्याचा पर्यटन व्हिसा वैध असूनही त्याला मलेशिया विमानतळावर थांबवण्यात आले आहे.' याबाबत मदतीचे ट्विट तरुणाने करताच खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी तत्काळ दखल घेत यंत्रणेला कामाला लावले.

अमोल गोल्हार हा आष्टी तालुक्यातील युवक मलेशियात कामाला आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा भाऊ मलेशियाला गेला हेाता. परंतु, विमानतळावरच त्यांना थांबवून प्रवेश नाकारण्यात आला. दूरवरून आलेल्या आपल्या भावाला प्रवेश नाकारल्याने हताश झालेल्या अमोल गोल्हार यांनी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा उल्लेख करून मदत करण्याची विनंती ट्विटद्वारे केली.

गोल्हार यांच्या ट्विटला प्रतिसाद देऊन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आपल्या कार्यालयाला यासंबंधी माहिती घेण्यास सांगीतले. माहिती मिळताच खासदार मुंडे यांच्या कार्यालयाकडून त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला व निश्चिंत राहण्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वीच अमोल गोल्हार यांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मलेशियाने भारताकडे रवाना केले होते.

परंतु मायदेशापासून हजारो मैल दूर असूनही आपल्या जिल्ह्याच्या खासदार एका ट्विटची दखल घेऊन संकटसमयी मदतीसाठी धावल्या या भावनेने त्या तरुणाला मोठा आधार वाटला. त्यानेही लागलीच ट्विट करून खासदार प्रितम मुंडे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT