The problem of drinking water in Sengaon taluka has become serious as the power distribution company has cut off the connection.jpg 
मराठवाडा

उर्जामंत्री साहेब लाईट तोङली; प्यायला पाणी द्या, मुक्या जनावरांच्या गळ्यात शेतकऱ्याने बांधले फलक

विठ्ठल देशमुख

सेनगाव (हिंगोली) : थकित विज बिलामुळे विज वितरण कंपनीने कनेक्शन तोडल्यामुळे सेनगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे नागरिकांसह मुक्या जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्याच्या नावाने मुक्या जनावरांच्या गळ्यात फलक बांधून उर्जामंत्री साहेब लाईट तोङली, प्यायला पाणी द्या अशी भावनिक हाक दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात विज वितरण कंपनीच्या विरोधात विरोधी वाढीव विज बिलावरुन राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन व निदर्शने केली आहेत. महावितरण कंपनीकडून विज ग्राहकांना वाढीव विज बिल देऊन लवकरात-लवकर बिल भरा, अन्यथा तुमचे विज कनेक्शन कापण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यात देखील अनेक विज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज बिल देऊन फसवणूक केली जात आहे. तर काही थकित बिलामुळे अनेक गावांमध्ये विज पुरवठा खंडीत केल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. यामध्ये आजेगांव, ताकतोडा, ब्रम्हवाडी, हिवरखेडा, बोरखेड़ी, केलसुला, म्हाळसापूर आदिसह इतर काही गावातील सुध्दा विज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

यातील म्हाळसापूर येथे तब्बल २५ दिवस विज पुरवठा बंद केल्यामुळे गांवकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. तर काही ठिकाणी पैसे भरल्यानंतर विज पुरवठा सुरळीत करण्यात आला. आता आजेगांव परिसरातील विज कनेक्शन कापल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गहू, हरबरा, भुईमुंग आदी पिकांना पाणी देण्याचे दिवस सुरु असतानाच विज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांसह मुक्या जनावरांना सुध्दा प्यायला पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक व शेतकरी विज वितरण कंपनी विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आजेगांव परिसरातील विज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्याने थेट ऊर्जा मंत्र्याच्या नावावर एक अनोखे फलक लाऊन त्यावर उर्जामंत्री साहेब लाईट तोङली; प्यायला पाणी द्या' अशा शब्दात ऊर्जा मंत्र्याला भावनिक हाक दिली आहे. आता ऊर्जा मंत्री काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: भात आणि ऊस कापणीच्या काळात कोल्हापुरात ४० जणांचा सर्पदंशाने मृत्यू.

Latest Marathi News Live Update : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका आंदोलन

Yoga for Diabetes and Hernia: फक्त पचनासाठी नाही तर मधुमेह अन् हार्नियावरही प्रभावी ठरते 'हलासन'; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

मनसेसोबत युती करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, मविआच्या नेत्यांना दिला सल्ला

Kolhapur Guns License : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक पाच हजार बंदुका जमा करण्याचे आदेश, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT