deshmukh.jpg 
मराठवाडा

समाजभानाचे ‘प्रोजेक्ट कर्तव्य’

स्वप्निल गायकवाड


नांदेड ः सध्या ‘कोरोना’चा दिवसेंदिवस वाढता संसर्ग असल्याने शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. सर्व शहर बंद असल्याने हातावर पोट असलेल्या आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बेघर नागरिकांचा दोन वेळ जेवणाची भ्रांत निर्माण झालेली आहे. या संघर्षाच्या परिस्थितीशी अस्तित्वासाठीचा सामना करण्यासाठी राज्यभरातील डॉक्टर, इंजिनियर, पदवीधर आदींचा सहभाग असलेल्या ‘प्रोजेक्ट कर्तव्य’ या सामाजिक भान जपलेल्या तरुणांच्या संघटनेने कौतुकास्पद पाऊले उचलले आहे. 

चुकीच्या मजकुराला वास्तविक रूप
‘प्रोजेक्ट कर्तव्य’ हे ३०० तरुणांचे संघटन असून राज्यभरात अशा गरजू नागरिकांना सकाळ आणि संध्याकाळचे जेवण स्व- खर्चातून व मिळविलेल्या देणगीमधून करत आहे. राजस्थान मधून कामाच्या शोधात आलेल्या ४० कुटुंबांची जबाबदारी ‘प्रोजेक्ट कर्तव्या’ने घेतली आहे. सद्ध्या पसरत असलेल्या खोट्या अफवांविरोधात जनजागृती करण्यासाठी सुद्धा संघटनेने  ‘डिजिटल आर्मी अगेंस्ट फेक न्यूज’ स्थापन केलेली आहे. या माध्यमातून खोट्या बातम्या, मजकूर आदी माहिती संबंधित शासकीय यंत्रणेस दिली जाते व अशा चुकीच्या मजकुराला वास्तविक रूप देऊन प्रसारित केले जाते.


शासनाची विशेष परवानगी
सद्य परिस्थितीत सर्व नागरिक ‘सेल्फ क्वारांटाईन ॲट होम’ असल्यामुळे संघटनेने एक हेल्पलाईन सुरू केली आहे. जिच्यामार्फत मानसिक दृष्ट्या हळव्या तरुणांशी संवाद साधणे, वाचनासाठी ई - बुक उपलब्ध करून देणे आदी उपक्रम चालविले जात आहेत. ‘प्रोजेक्ट कर्तव्य’ हे शासनाची विशेष परवानगी घेऊन अधिकृत ओळखपत्रांसह हे समाजकार्य करत आहे.


‘प्रोजेक्ट कर्तव्य’ची टीम हे सर्व कार्य करताना विशेष सुरक्षेचीही काळजी घेत आहे. अशी माहिती संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ धामणकर आणि मीडिया विभागप्रमुख श्री. राहुल मंगनाळे यांनी दिली आहे. या संघटनेच्या वतीने नागरिकांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदत करण्यासाठी संघटनेच्या facebook.com/Projectkartavya या संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा ९१७५९२५२८२, ९५७९५७५५७८ या भ्रमणध्वनींवरून संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT